---Advertisement---

सततच्या पराभवानंतर संघसहकाऱ्याने ठेवला स्मृतीच्या खांद्यावर हात! म्हणाली, “ती कर्णधार म्हणून युवा”

---Advertisement---

महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे खराब प्रदर्शन सुरूच आहे. शुक्रवारी (दि. 11 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या आठव्या सामन्यात युपी वॉरियर्झ संघाने आरसीबीची धूळधाण उडवली. युपीने या सामन्यात तब्बल 10 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेतील दुसरा सामना खिशात घातला. दुसरीकडे, आरसीबीचा हा स्पर्धेतील सलग चौथा पराभव ठरला. या पराभवानंतर संघाची कर्णधार स्मृती मंधाना हिच्यावर टीका होत आहे. मात्र, आता तिची संघसहकारी असलेल्या एलिस पेरीने तिची पाठराखण केली.

युपी विरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर एलिस पेरी बोलताना म्हणाली,

“स्मृती स्वतःवर काहीसा जास्त दबाव घेत आहे. एका नव्या स्पर्धेत येणे आणि नव्या खेळाडूंच्या संचासह सुरुवात करणे काहीसे अवघड असते. कर्णधार म्हणून देखील ती शानदार आहे. अद्याप खूप युवा असून, तिला या स्पर्धेतून बरेच काही शिकता येईल.”

स्पर्धेतील पहिले तीन सामने जिंकल्यानंतर विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या आरसीबीने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ते पुन्हा एकदा अपयशी ठरले. पेरी हिने 52 धावा करत अर्धशतक पूर्ण केले. तिच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबी संघ 19.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 138 धावा करू शकला. या आव्हानाचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्झ संघाकडून कर्णधार एलिसा हिली (Alyssa Healy) हिने वादळी फलंदाजी करत नाबाद 96 धावा चोपल्या. त्यामुळे हे आव्हान यूपीने फक्त 13 षटकात गाठले. यावेळी हिलीला देविका वैद्य हिने साथ दिली आणि नाबाद 36 धावा केल्या.

(Elysse Perry Backs Smriti Mandhana As RCB Captain In WPL)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कसोटी क्रिकेट वाचवायच्या फक्त गप्पा मारू नका”, आयसीसीवर संतापला मॅथ्यूज, वाचा संपूर्ण प्रकरण
बापाचा खेळ पाहून हरखल्या पोरी! उस्मान ख्वाजाच्या चिमुरड्यांचा ‘क्युट’ फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---