Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तगडी बोली घेत एलिस पेरी आरसीबीकडे! स्मृतीसह लढवणार मैदान

February 13, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ellyse-Perry

Photo Courtesy: Twitter/T20WorldCup


वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावात महिला खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडताना दिसला. ऑस्ट्रेलियन महिला संघाचे सर्वात अनुभवी अष्टपैलू एलिस पेरी हिच्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने तब्बल 1 कोटी 70 लाखांची बोली लावत तिला आपल्या संघात सामील करून घेतले. ‌‌ याच संघात भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना,‌ न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन व भारताची युवा रेणुका सिंग या सामील आहेत.

.@RCBTweets fans, make way for Australian all-rounder @EllysePerry 😃👌#WPLAuction pic.twitter.com/oyFz1NVEbD

— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 13, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी अष्टपैलू म्हणून पेरीकडे पाहिले जाते. ती आक्रमक फटकेबाजीसह उत्कृष्ट मध्यमगती गोलंदाजी देखील करते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंधरा वर्षाचा अनुभव तिच्या पाठीशी आहे. त्यामुळे तिला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व आरसीबी यांच्यामध्ये मोठी लढत पाहायला मिळाली. मुंबईने अखेरीस माघार घेतल्याने आरसीबीने 1 कोटी 70 लाखांची बोली लावत तिला आपल्या संघात सामील करून घेतले.

आरसीबीने लिलावाच्या पहिल्याच राऊंडमध्ये बाजी मारत भारताची उपकर्णधर स्मृति मंधाना हिला 3 कोटी 40 लाखांच्या रकमेत आपल्या संघात सामील करून घेतले. तिच्यासोबतच न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन व सध्या भारताची सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेली रेणुका ठाकूर आरसीबीचा भाग असतील.

(Elysse Perry Goes To RCB In Whopping 1 Crore 70 Lakhs With Smriti Mandhana)


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI Womens

पाकची जिरवणारी जेमिमा रॉड्रिग्ज तब्बल 2.20 कोटींच्या बोलीसह दिल्लीच्या ताफ्यात दाखल

Photo Courtesy: Twitter/Women’s CricZon

अष्टपैलू दीप्ती शर्मा यूपी वॉरिअर्सच्या ताफ्यात सामील, फ्रँचायझीने खर्च केले तब्बल 'एवढे' कोटी

Photo Courtesy: Twitter

विश्वचषक विजेत्या 'कर्णधार' शेफालीसाठी दिल्लीने दिली मुंबईला टक्कर, तब्बल 2 कोटी मोजून घेतले संघात

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143