सध्या श्रीलंकेत सुरू असलेल्या एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने सोमवारी (17 जुलै) दुसरा सामना खेळला. नेपाळविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 9 गड्यांनी विजय मिळवत नेपाळवर एकतर्फी मात केली. भारताच्या विजयात सलामीवीर अभिषेक शर्मा व साई सुदर्शन यांनी दमदार फलंदाजी केली. तर, गोलंदाजीत निशांत सिंधू व राजवर्धन हंगरगेकर यांनी सात फलंदाजांना बाद केले. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात युएईचा पराभव केलेला.
या सामन्यात नेपाळचा कर्णधार रोहित पोडेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांमुळे त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. राजवर्धन हंगरगेकर व हर्षित राणा यांनी केवळ 37 धावांमध्ये नेपाळचे पाच फलंदाज बाद केले. कर्णधार रोहित पोडेल व गुलशन झा यांनी अनुक्रमे 65 व 38 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. भारतासाठी फिरकीपटू निशांत सिंधू याने सर्वाधिक चार, राजवर्धन हंगरगेकरने तीन तर हर्षित राणाने दोन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा व साई सुदर्शन यांनी शतकी सलामी दिली. अभिषेक शर्मा याने आक्रमक फलंदाजी करताना 69 चेंडूवर 12 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. साई सुदर्शन याने 52 चेंडूवर 58 धावा करताना ध्रुव जुरेलच्या 12 चेंडूतील नाबार्ड 21 धावांच्या जोरावर नऊ गड्यांनी विजय साकार केला. यासह भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा अखेरचा साखळी सामना 19 जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल.
(Emerging Asia Cup India Beat Nepal Abhishek Sharma Sai Sudarshan And Hangargekar Shines)
महत्त्वाच्या बातम्या-
आरंभ है प्रचंड! बेंगलोरमध्ये तयार होतेय वर्ल्डकपसाठीची टीम इंडिया
रोहितने दिलेल्या सल्ल्यामूळे बदलले तिलक वर्माचे करियर! लहानपणीच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा