---Advertisement---

रोहितने दिलेल्या सल्ल्यामूळे बदलले तिलक वर्माचे करियर! लहानपणीच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा

---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, अनुभवी खेळाडूंना या संघात जागा मिळाली नसली तरी, अनेक युवा खेळाडूंना या संघात संधी दिली गेली. मागील दोन हंगामापासून आयपीएल व देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या तिलक वर्मा याला प्रथमच भारतीय संघात समाविष्ट केलेले आहे. भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर तिलकच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांनी त्याला रोहित शर्माने दिलेल्या एका खास सल्ल्याबाबत सांगितले.

रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत तो संघाचा भाग बनल्याने त्याला आपले पदार्पण करण्याची चांगली संधी असेल. याच पार्श्वभूमीवर त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक बयाश यांनी प्रतिक्रिया दिली.

“तिलकचा कारकिर्दीत मुंबई इंडियन्सचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांनीच त्याला बनवले. ज्या ड्रेसिंग रूममध्ये सचिन तेंडुलकरसारखा व्यक्ती आहे तिथे तुम्ही सर्वोत्तम होता. तिलक मला सांगत होता की, रोहित शर्मा त्याला कायम बिंदास खेळ टेन्शन घेऊ नको, असे सांगतो. याच गोष्टीमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो.” अनेकदा रोहित शर्मा हा देखील तिलकचे कौतुक करताना दिसला आहे. आयपीएल दरम्यान सचिन तेंडुलकरने देखील त्याची वाहवा केलेली.

तिलकने यावर्षी मुंबईसाठी विविध क्रमांकावर फलंदाजी करताना 14 सामन्यात 397 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी 36 पेक्षा अधिक तर स्ट्राईक रेट 130 पेक्षा जास्त होता. तिलक डावखुरा फलंदाज असल्याने आगामी काळात तो भारतीय संघासाठी देखील महत्त्वाचा फलंदाज म्हणून सिद्ध होऊ शकतो. अनेक जण त्याला भविष्यातील भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज मानत आहे.
(Tilak Verma Follow Rohit Sharma Advice Say Childhood Coach)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---