Emerging Asia Cup: इमर्जिंग आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत अ आणि पाकिस्तान अ चे क्रिकेट संघ भिडू शकतात. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. अशा स्थितीत दोन्ही संघ उपांत्य फेरीतील सामना जिंकून अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात. तिलक वर्मा याच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने या स्पर्धेत सलग 3 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जिथे त्यांचा सामना अफगाणिस्तानशी होईल. दुसरीकडे, तीनपैकी 2 सामने जिंकून पाकिस्तानने उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले असून, जिथे त्यांचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ या स्पर्धेत एकदा भिडले आहेत. साखळी फेरीत दोघेही आमनेसामने आलेले. जेथे भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव करून स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली होती. आता अंतिम फेरीत दोघेही आमनेसामने येऊ शकतात, अशी शक्यता आहे. जर भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानला हरवले आणि पाकिस्तानने श्रीलंकेला हरवले तर, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होईल.
भारतीय संघाने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून, अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ 6 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. भारताच्या गटात, पाकिस्तान संघ होता ज्यांनी 3 पैकी 2 सामने जिंकले आणि चार गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. अ गटातून श्रीलंकेने 3 पैकी 2 सामने जिंकले तर अफगाणिस्तानने 2 सामने जिंकले. सरस धावगतीच्या आधारावर, श्रीलंका आपल्या गटात अव्वल तर अफगाणिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले होते. मात्र अ गटातून बांगलादेश आणि हाँगकाँग बाहेर पडले आहेत. तर ब गटातून यजमान यूएई आणि ओमान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाले.
महत्त्वाच्या बातम्या-
सरफराज खानने आक्रमकपणे कर्णधार रोहितला डीआरएस घेण्यासाठी मनवले आणि नंतर… Video
IND vs NZ; “मला काय माहिती, त्याला हिंदी येते” भारतीय खेळाडूचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
भारताच्या माजी कर्णधारानं अचानक निवृत्ती जाहीर केली, 16 वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम