भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर रंगला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे, तर त्याच्या मस्तीमुळेही तो चाहत्यांना आवडतो. पण पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशीही त्याची हीच शैली पाहायला मिळाली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान पंत गोलंदाजांना विकेट्सच्या मागे मार्गदर्शन करताना आणि त्यांना प्रोत्साहन देताना दिसला. मात्र, दरम्यान त्याचा एक डाव फसला. वास्तविक, एजाज पटेल (Ajaz Patel) फलंदाजी करत असताना पंतने वॉशिंग्टन सुंदरला सांगितले की, चेंडू थोडा पुढे टाकू शकतो, बाहेरही ठेवू शकतो. पंतच्या विनंतीवरून सुंदरने चेंडू बाहेर टाकला आणि पटेलने अप्रतिम शॉट खेळत चौकार मारला. यानंतर पंत सुंदरला म्हणाला की, “मला काय माहित, त्याला हिंदी येते.” या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
RISHABH PANT – A COMPLETE ENTERTAINER 😄👌 pic.twitter.com/2FltS9NgdP
— Johns. (@CricCrazyJohns) October 24, 2024
न्यूझीलंड संघाचा उत्कृष्ट फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) हा भारतीय वंशाचा क्रिकेटपटू आहे, म्हणूनच तो हिंदी चांगले बोलतो आणि समजतो. पण कदाचित पंतला याची जाणीव नव्हती. याचाच फायदा एजाजने घेतला. मात्र, त्याला केवळ 4 धावा करता आल्या.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11-
भारत- यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षख), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड- टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टीम साउधी, एजाज पटेल, विल्यम ओरूर्के
महत्त्वाच्या बातम्या-
वॉशिंग्टन सुंदरनं सात विकेट घेत मिळवलं दिग्गजांच्या क्लबमध्ये स्थान, 7 वर्षांनंतर असं प्रथमच घडलं!
पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व, आता मदार फलंदाजांवर!
गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक! पुणे कसोटीत वॉशिंग्टनची अति ‘सुंदर’ कामगिरी