इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० च्या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यासाठी बीसीसीआयकडून अधिकृत पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) मिळाल्याची पुष्टी अमिराती क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) सोमवारी (२७ जुलै) केली आहे.
आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी मागील आठवड्यात सांगितले होते. ते म्हणाले होते की, स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये होईल, जे भारत सरकारच्या परवानगीवर अवलंबून असेल.
ईसीबीचे महासचिव मुबाशिर उस्मानी (Mubashshir Usmani) यांनी म्हटले, “आम्हाला अधिकृत पत्र मिळाले आहे आणि आता भारत सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, जेणेकरून अंतिम करार होईल.”
भारत सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे, परंतु उस्मानी म्हणाले की, दोन्ही मंडळांनी काम सुरू केले आहे आणि सुरक्षित वातावरणात स्पर्धेची तयारी करण्यासाठी संबंधित अंतर्गत कार्य समितीसह संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
कोरोना व्हायरसदरम्यान (Corona Virus) ८ आयपीएल संघाचे आयोजन परदेशात करणे, हे व्यवस्थापनाशी निगडीत मोठे आव्हान असेल. असे असले तरीही या टी२० लीगचे आयोजन केल्यामुळे यूएईच्या अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होण्याची अपेक्षा आहे.
उस्मानी म्हणाले, “जगातील सर्वात रोमांचक, लोकप्रिय आणि आकर्षक स्पर्धेचे आयोजन आणि व्यवस्थापनावर परिणाम होईल. लोक आणि उपकरणांची बरीच ने-आण होईल आणि युएईमध्ये आयपीएलच्या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी तज्ञांची नेमणूक करण्याची गरज आहे. यात अबू धाबी, दुबई आणि शारजाह स्पोर्ट्स काउन्सिल, अबू धाबी, दुबई आणि शारजाह टूरिझम युनिट आणि संबंधित पोलिस विभाग आणि युएईच्या आरोग्य मंत्रालयासारख्या संबंधित सरकारी विभागांचा समावेश आहे.”
यूएईचे सर्व सरकारी विभाग या स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सक्षम आहेत आणि यापूर्वीही त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. भारतात २०१४ साली लोकसभा निवडणूका असल्यामुळे यूएईने जगातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलच्या २० सामन्यांचे आयोजन केले आहे. उस्मानी म्हणाले, “कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणाशी सल्ला मसलत करायचे आहे, हे आम्हाला माहीत आहे.”
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने ही स्पर्धा आयोजित करण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी बैठक घेण्याची अपेक्षा आहे. यात संघांची प्रतीक्षा करीत असलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) समाविष्ट आहे. कडक सुरक्षा नियमांसह ही स्पर्धा आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. युएईमध्ये कोरोना विषाणूचा साथीचा आजार नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येत आहे आणि सध्या तेथे सहा हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत.
“सर्वप्रथम यूएई सरकारने कोरोना व्हायरसबाबत दिलेल्या प्रतिक्रियेने आम्ही खूप खुश आहोत. सरकारने फेब्रुवारीमध्येही कार्यवाही सुरु केली होती. देशभरात कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत. आणि लोकांच्या बरे होण्याची संख्या वाढत आहे,” असे कोरोना व्हायरसबद्दल बोलताना उस्मानी म्हणाले.
“दुसरं म्हणजे, संबंधित आरोग्य अधिकारी कोविड-१९ बाबत काही सुरक्षित पाऊलं टाकायला सांगतील, तेव्हा आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ. शेवटी बीसीसीआय आपली आवश्यकता यजमान देशाला कळवेल, अमिराती क्रिकेट प्रत्येक वेळी पाठिंबा देईल आणि आधार देईल,” असेही ते पुढे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘त्याने अश्विन समोर द्विशतक केले, तर आता तो कोणत्याही फिरकी गोलंदाजाचा सामना करु शकतो’
-शोएब अख्तरवर फिदा होती ही भारतीय अभिनेत्री; इन्स्टाग्रामवर आहेत 34 लाख फॉलोअर्स
-आता धोनीच्या खांद्यावर दिसणार नाही झिवा, पहा काय केलाय क्रिकेटरसाठी नवा नियम
ट्रेंडिंग लेख-
-गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….
-६ युवा खेळाडू जे यावर्षी २०२० आयपीएलमध्ये करू शकतात पदार्पण…
-रोहित-विराटला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारे हे ५ फलंदाज…