औंरंगाबाद। ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत तिस-या फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकीत व्योम शाहने चौथ्या मानांकीत मार्क्स डार्विनचा 6-2, 6-1 असा, अंकित देशपांडेने दुस-या मानांकीत व्रज गोहिलचा 6-2, 3-6, 6-2 असा तर रुरिक रजनीने तिस-या मानांकीत समर्थ सहिताचा 6-2, 6-3 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तिस-या फेरीत मुलींच्या गटात अव्वल मानांकीत तानिया गोगुलामंदाने वेनेला रेड्डीचा संघर्षपुर्ण लढतीत 6-7(5), 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. पाचव्या मानांकीत ऋषिता रेड्डीने आनंदिता उपाध्यायचा 6-3, 6-0 असा तर सातव्या मानांकीत मनोज्ञ मदासूने नवव्या मानांकीत प्रार्थना सोलंकीचा (9)6-0, 6-3 असा पराभव करत आगेकुच केली.
दुहेरीच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात संप्रित शर्मा व प्रद्युम्न तोमर या सहाव्या मानांकीत जोडीने अव्वल मानांकीत समर्थ सहिता व व्रज गोहिल यांचा 6-7(4), 6-4 10-8 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव केला. बिगर मानांकीत ओजस मेहलावत व दक्ष कपूर या जोडीने पाचव्या मानांकीत मुरली रत्नाला व राहुल लोकेश यांचा 6-3, 6-1 दुहेरीच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात तानिया गोगुलामंदा व नैनिका रेड्डी या अव्वल मानांकीत जोडीने वंशिका वैज व जान्हवी काजला यांचा 7-6(5),6-2 असा तर माया राजेश्वरन व ऐश्वर्या जाधव या सहाव्या मानांकीत जोडीने शताक्षी चौधरी व आकृती सोनकुसरे या सातव्या मानांकीत जोडीचा 7-6(3), 6-3 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत दुहेरीच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- तिसरी फेरी- मुले
संप्रित शर्मा (1) वि.वि आरव चावला 6-1, 6-4
व्योम शाह वि.वि मार्क्स डार्विन (4) 6-2, 6-1
अंकित देशपांडे वि.वि व्रज गोहिल (2) 6-2, 3-6, 6-2
रुरिक रजनी वि.वि समर्थ सहिता (3) 6-2, 6-3
तनुष घिलदयाल (6) वि.वि हृषीक वाविलापल्ली 4-6, 6-0, 7-5
आराध्य क्षितिज वि.वि आश्रव्य मेहरा 6-4, 6-3
अर्णव पापरकर (5) वि.वि व्ही. थिरुमुरुगन 6-3, 6-0
प्रद्युम्न तोमर वि.वि प्रणील शर्मा 6-3, 6-3
एकेरी गट: तिसरी फेरी: मुली
तानिया गोगुलामंदा(1) वि.वि वेनेला रेड्डी 6-7(5), 6-4, 6-4
ऋषिता रेड्डी (5) वि.वि आनंदिता उपाध्याय 6-3, 6-0
मनोज्ञ मदासू (7) वि.वि प्रार्थना सोलंकी (9)6-0, 6-3
दुहेरी गट:पहिली फेरी: मुले
संप्रित शर्मा/ प्रद्युम्न तोमर (6) वि.वि समर्थ सहिता/ व्रज गोहिल (1) 6-7(4), 6-4 10-8
ओजस मेहलावत/ दक्ष कपूर वि.वि मुरली रत्नाला/ राहुल लोकेश (5) 6-3, 6-1
दक्ष कुक्रेती/वेदांत भसीन(4) वि.वि आराध्य क्षितिज/व्योम शाह(7) 6-4, 6-4
तनय शर्मा/ यश पटेल वि रुद्र बाथम/ अनिश जैन 6-3, 6-2
व्हि.थिरुमुरुगन/ आराध्य द्विवेदी(8) वि.वि पानशुल उबोवेजा/ कंज शाह 6-2, 2-6, 10-6
हृषीक वविलापल्ली/ धीरज रेड्डी(3) वि.वि अमृत धनकर/ आश्रव्य मेहरा 6-0, 6-3
आरव चावला/ प्रणील शर्मा वि लेविन मायडीन/ मार्क्स डार्विन 6-1, 6-1
तनुष घिलदयाल/ अर्णव पापरकर(2) वि.वि अभिराम निलाखे/ अव्दिक नाटेकर 6-2, 4-6, 10-4
दुहेरी गट: पहिली फेरी: मुली
तानिया गोगुलामंदा / नैनिका रेड्डी (1) वि.वि वंशिका वैज / जान्हवी काजला 7-6(5),6-2
ऋषिता रेड्डी / सोहिनी मोहंती (2) वि.वि अलीना फरीद / आराध्या वर्मा 6-1, 6-4
माया राजेश्वरन / ऐश्वर्या जाधव (6) वि.वि शताक्षी चौधरी / आकृती सोनकुसरे (7) 7-6(3), 6-3
हरिताश्री व्यंकटेश / मनोज्ञा मदासू (4) वि. वि व्हि. याशिका/ आनंदिता उपाध्याय 6-2, 6-2
एन. हर्षिनी/ स्निग्धा कांता वि.वि आनंदी भुतडा / सेजल भुतडा 6-2, 6-2
प्रार्थना सोलंकी / लक्ष्मी दांडू (3) वि.वि दिव्या उंग्रीश / नीलाक्षी लाथेर (8) 7-6(4),7-6(4)
पेहल खराडकर / ए. आहन वि अन्वी पुनागंटी / ईशी माहेश्वरी 6-0, 6-2
महत्त्वाच्या बातम्या –






