औंरंगाबाद। ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशभरातून मुले व मुली दोन्ही गटात एकूण 150 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे 18 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत रंगणार आहे.
ईएमएमटीसी कॉम्प्लेक्सच्या क्ले कोर्टवर होणारी स्पर्धेची हि सहावी मालिका आहे. कोविडमुळे फेब्रुवारी 2021 मध्ये औरंगाबादमध्ये आयोजित करता आली नाही, परंतु मुंबईतील एमएसएलटीए येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गतवर्षी महाराष्ट्राच्या आस्मी आडकर आणि तामिळनाडूच्या प्रणव रेथिनने यांनी विजेतेपद पटकावले होते.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, स्पर्धेत एकूण एकूण 2 लाख रुपयांची शिष्यवृत्ती खेळाडूंना प्रदान करण्यात येणार असून स्पर्धेच्या पहिल्या फेरीपासूनच खेळाडूंना एनर्झल यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे आणि भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत. “औरंगाबाद आणि ईएमएमटीसी सेंटरमध्ये पुन्हा हि स्पर्धा होत असल्यामुळे आम्हांला आनंद झाला असून यामुळे मराठवाडा भागातील खेळाडूंना मदत मिळणार आहे. तसेच, अधिकाधिक राष्ट्रीय मानांकन स्पर्धा व शिबिरांचे आयोजन ईएमएमटीसी सेंटर येथे करण्याचे आम्ही नियोजन करत आहोत.
स्पर्धेत औंरंगाबादची मृण्मयी जोशी व निरज रिंगणगावकर यांसह मराठवाडा भागातील एकूण 20 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. यामधे परभणी, नांदेड आणि औंरंगाबाद येथील खेळाडू पात्रता फेरीत खेळताना दिसणार आहेत. याशिवाय अर्णव पापरकर, नैनिका रेड्डी, ऐश्वर्या जाधव, मनन अग्रवाल हे महाराष्ट्रातील मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
“मराठवाड्यात अधिकधिक टेनिस कोर्ट, प्रशिक्षक, खेळाडूंमध्ये टेनिसचा होत असलेला प्रसार बघुन आम्हांला खूप आनंद झाला आहे”. असे अय्यर म्हणाले. वर्षा जैन आणि अनुरंग जैन यांनी टेनिस उपक्रमांना दिलेल्या अतुलनीय पठिंब्याबद्दल तसेच, औरंगाबादमध्येच नव्हे तर बीड, परभणी, नांदेड आणि जालना या ठिकाणीही या खेळाच्या प्रचारासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे अय्यर यांनी नमूद केले.
याशिवाय मुलांचा मुख्य ड्रॉ 64 चा असेल तर, मुलींचा मुख्य ड्रॉ 48 चा असणार आहे. पात्रता फेरीचे सामने शनिवार, 18 व रविवार, 19 डिसेंबर रोजी तर सोमवारी, 20 डिसेंबर पासून मुख्य फेरीच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व 200 एआयटीए गुण तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 150 एआयटीए गुण देण्यात येणार आहेत.
स्पर्धा संचालक वर्षा जैन असणार असून या स्पर्धेसाठी वैशाली कन्नमवार यांची एआयटीए सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे., प्रवीण प्रसाद आणि प्रविण गायसमुद्रे यांची या स्पर्धेसाठी मुख्य रेफ्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये संजय दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली आणि एमएसएलटीए कौन्सिल सदस्य अली पंजवानी, आशुतोष मिश्रा आणि ईएमएमटीसीचे गजेंद्र भोसले यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वरिष्ठ गट राज्यस्तरीय सॉफ्टबॉल: पुणे ब संघाला विजेतेपद, स्वप्नील गदादे सर्वोत्तम खेळाडू
राष्ट्रीय वुशू स्पर्धेत पुण्याच्या श्रावणी कटकेला एक रौप्य व दोन कांस्य