स्वित्झर्लंडचा सर्वकालीन महान टेनिसपटू रॉजर फेडरर याने शुक्रवारी (23 सप्टेंबर) आपला अखेरचा स्पर्धात्मक सामना खेळला. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री झालेल्या लेवर कपमधील दुहेरीच्या या सामन्यात त्याने राफेल नदालसह भाग नोंदवला होता. या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी, संपूर्ण वातावरण फेडररमय झाले होते. फेडररच्या निवृत्तीनंतर नदाल अक्षरशः ढसाढसा रडताना दिसला.
लंडनमध्ये झालेल्या सामन्यात रॉजर फेडरर (Roger Federer) हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात जिंकू शकला नाही. त्यांचा सामना अमेरिकेच्या फ्रांसेस टियाफो–जॅक सॉक यांच्यासोबत होता. हा सामना फेडरर-नदाल जोडीने 4-6, 7-6 (2), 11-9 असा गमावला. सामन्यानंतर फेडररला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला. यावेळी फेडरर-नदाल या दोघांनाही अश्रू अनावर झाले आहेत. या दोघांचा इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
All the Fedal feelings.#LaverCup pic.twitter.com/WKjhcADFoe
— Laver Cup (@LaverCup) September 24, 2022
रॉजर फेडरर याला 21 व्या शतकातील सर्वात महान टेनिसपटू म्हणून ओळखले जाते. 1998 मध्ये व्यावसायिक टेनिसला सुरुवात करणाऱ्या फेडररने 2003 मध्ये विम्बल्डनच्या रुपाने त्याने पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. त्यानंतर आपल्या आजवरच्या कारकिर्दीत त्याने 8 विम्बल्डन, 6 ऑस्ट्रेलियन ओपन, 5 अमेरिकन ओपन व 1 फ्रेंच ओपन जिंकले आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने तब्बल 103 ग्रँडस्लॅम आणि एटीपी असून विजेतेपदे जिंकली असून, दुहेरीत 2008 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर तो 310 आठवडे (एटीपी) जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहिला आहे.
If there's one thing you watch today, make it this.#LaverCup | @rogerfederer pic.twitter.com/Ks9JqEeR6B
— Laver Cup (@LaverCup) September 23, 2022
याच महिन्यात फेडररने निवृत्तीची घोषणा केली. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “मी 24 वर्षाच्या कारकिर्दीत 1500पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. आता वेळ आली आहे निरोप घेण्याची.”
फेडररने 2018चे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत कारकिर्दीतील 20वे ग्रँड स्लॅम जिंकले. त्यानंतर दुखापतीमुळे त्याच्या फॉर्ममध्ये घसरण झाली. त्याने यावर्षी एकही ग्रँड स्लॅम खेळले नाही. 2021 फ्रेंच ओपन हे त्याच्या टेनिस कारकिर्दीतील अखेरचे ग्रँड स्लॅम ठरले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्युनियर तेंडुलकर झाला 23 वर्षांचा; जाणून घ्या बर्थ डे बॉयच्या आयुष्यातील मजेशीर किस्से
वाढदिवस विशेष – क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ