fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठीत माहिती- क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ

September 24, 2020
in खेळाडू
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


संपुर्ण नाव- मोहिंदर अमनरनाथ भारद्वाज

जन्मतारिख- 24 सप्टेंबर, 1950

जन्मस्थळ- पटियाला, पंजाब

मुख्य संघ- भारत, बडोदा, दिल्ली, डर्हम, पंजाब आणि विल्टशायर

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 24 ते 28 डिसेंबर, 1969

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण-  भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 7 जून, 1975

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 69, धावा- 4378, शतके- 11

गोलंदाजी- सामने- 69, विकेट्स- 32, सर्वोत्तम कामगिरी- 4/63

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 85, धावा- 1924, शतके- 2

गोलंदाजी- सामने- 85, विकेट्स- 46, सर्वोत्तम कामगिरी- 3/12

थोडक्यात माहिती-

-मोहिंदर यांचा जन्म क्रिकेट खेळणाऱ्या कुटुबांत झाला. त्यांचे वडील लाला अमरनाथ यांनी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले होते. ते स्वातंत्र्यानंतर भारतीय संघाचे पहिले कर्णधार होते. कसोटी पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी शतक ठोकले होते. तसेच, ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांची हिट विकेट घेणारे ते एकमेव गोलंदाज आहेत.

-मोहिंदरचे भाऊ सुरिंदर अमरनाथ यांनीही भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले आहे. तसेच, त्यांनीही त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकले होते. शिवाय, सुरिंदर यांचा मुलगा दिग्विजय हे बदुरेलिया स्पोर्ट्स क्लबसाठी (Badureliya Sports Club) खेळतो.

-तसेच, मोहिंदर यांचा लहान भाऊ रजिंदर अमरनाथ हे प्रथम श्रेणी क्रिकेटर होते. तसेच ते देशांतर्गतमध्ये ते सध्या प्रशिक्षक म्हणूनही काम पहातात.

-मोहिंदर अमरनाथ यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात अष्टपैलू गोलंदाज म्हणून केली होती. त्यानंतर ते मधल्या फळीतील फलंदाज म्हणून ओळखले जाऊ लागले.

मोहिंदर यांच्यासाठी 1982-83साल महत्त्वाचे ठरले. त्यावेळी त्यांनी वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्धच्या 11 कसोटी सामन्यात 1182 धावा केल्या होत्या. त्यात 5 शतकांचा समावेश होता

-मोहिंदर यांनी 1983च्या विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्त्वाची कामगिरी केली होती. उपांत्य सामन्यात त्यांनी 46 धावा केल्या होत्या आणि 2 विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच वेस्ट इंडिज विरुद्धच्या अंतिम सामन्यात महत्त्वाच्या 26 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना उपांत्य आणि अंतिम सामन्यात सामनावीरही पुरस्कार देण्यात आला होता.

-2009साली बीसीसीआयने त्यांच्या क्रिकेट क्षेत्रातील कामगिरीला पाहता त्यांना सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार दिला होता.

-मोहिंदर यांनी निवृत्तीनंतर बांगलादेश संघाला प्रशिक्षण दिले होते. मात्र, 1996 साली त्यांच्या प्रशिक्षणाखाली बांगलादेशला विश्वचषकात प्रवेश करता न आल्याने त्यांचे प्रशिक्षक पद काढून घेण्यात आले. त्यांनी रणजी ट्रॉफीत बंगाल संघाचेही प्रशिक्षण केले आहे.

-2011 ला मोहिंदर यांना निवड समीती सदस्य म्हणून निवडण्यात आले होते. मात्र त्यावेळी भारतीय संघाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्विकाराव्या लागलेल्या व्हाईटवॉशमुळे त्यांनी एमएस धोनीला कसोटी संघातून काढून टाकण्याची मागणी केल्याने त्यांना हे पद सोडावे लागले.


Previous Post

आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज

Next Post

“….यामुळे मला क्रीजवर वेळ घालवायचा होता,” युएईत पहिला विजय मिळवल्यानंतर रोहितने दिली प्रतिक्रिया

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

फक्त कर्णधार रहाणेच्या सांगण्यावरुन देशासाठी ‘त्याने’ दुखापतग्रस्त असताना केली होती ५ षटकं गोलंदाजी

January 23, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

RCB ने खरेदी केलेले DC चे ‘हे’ दोन धुरंदर यंदा संघाला जिंकून देऊ शकतात ट्रॉफी!

January 23, 2021
Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray
क्रिकेट

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

मोहम्मद सिराजला ५ विकेट्स मिळाव्या म्हणून ‘या’ खेळाडूने देवाकडे केली होती प्रार्थना 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

“तो खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला लागलेला शोध आहे”

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

“कोणी पहिलीत बीजगणित शिकत नाही”, रिषभच्या यष्टीरक्षण कौशल्याबाबत ‘या’ क्रिकेटरचे भाष्य

January 22, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

“….यामुळे मला क्रीजवर वेळ घालवायचा होता,” युएईत पहिला विजय मिळवल्यानंतर रोहितने दिली प्रतिक्रिया

Photo Courtesy: Twitter/IPL

पंजाब-आरसीबी आज येणार आमनेसामने; 'या' खेळाडूंना मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

Photo Courtesy: Twitter/IPL

मुंबईच्या 'या' पाच खेळाडूंमुळे कोलकाता संघाला पाहावे लागले पराभवाचे तोंड

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.