---Advertisement---

मैत्री असावी तर अशी! दिवंगत मित्रासाठी इंग्लंड-भारत पहिल्या कसोटीदरम्यान राखून ठेवली खुर्ची

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 6:38 PM
---Advertisement---

नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या भूमीवर सलग सातवी नाणेफेक गमावली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतीय संघाने या सामन्यात सुरुवात उत्कृष्ट केली आहे. मात्र, या सामन्यादरम्यानचे प्रेक्षकांमधील एक छायाचित्र सध्या चांगलेच चर्चेत आले.

ते छायाचित्र होतेय व्हायरल
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांना मैदानात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेली काही दिवस मैदाने निम्म्या क्षमतेने भरत होती. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही केवळ चार हजार प्रेक्षकांना मैदानात येऊ दिले होते.

या पहिल्या कसोटीतील चाहत्यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये आजूबाजूला सर्व प्रेक्षक बसलेले असताना एक खुर्ची रिकामी सोडण्यात आलेली दिसतेय.

याबाबत एका ट्विटर वापरकर्त्याने माहिती देताना म्हटले, ‘ही जॉन क्लार्क यांची अविश्वसनीय गोष्ट आहे. ज्यांनी मागील चाळीस वर्षात ट्रेंट ब्रिजवर झालेला एकही आंतरराष्ट्रीय सामना चुकविला नव्हता. ते आता आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या मित्रांनी ही सीट विकत घेत त्यांच्यासाठी राखीव ठेवली. खूप छान’ त्यानंतर, हे ट्विट आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या मैदानावर भारताची उत्कृष्ट कामगिरी
भारतीय क्रिकेट संघाने नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर आत्तापर्यंत ७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये दोन विजय व दोन पराभव त्यांना पहावे लागले तर, तीन सामने अनिर्णित झाले आहेत. या पहिल्या सामन्यातही भारतीय संघाने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना पहिल्या सत्रातच तंबूत धाडले.

महत्त्वाच्या बातम्या – 

आजवर एकही आयपीएल ट्रॉफी न जिंकलेल्या आरसीबीला कधी रामराम ठोकणार? डिविलियर्स म्हणाला…

बुम बुम बुमराह! अप्रतिम चेंडूने भारताला मिळवून दिले पहिल्याच षटकात यश, पाहा व्हिडिओ

भारतीय महिला हॉकी संघाने गमावली फायनलमध्ये पोहोचून इतिहास रचण्याची संधी; आता खेळणार ‘कांस्य’ सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---