---Advertisement---

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी२०साठी टीम इंडियात विराट आणि पंत परतले तर ‘या’ खेळाडूंना बसावे लागेल बाकावर

On: शनिवार, जुलै 9, 2022 5:09 PM
Virat-Kohli- Suryakumar-Yadav
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात भारताला सात विकेट्सने पराभूत व्हावे लागले. हा सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला होता. आता याच मैदानावर शनिवारी (९ जुलै) होणारा दुसरा टी२० सामना खेेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli), श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा संघात खेळण्याची शक्यता आहे. ही टी२० मालिका तीन सामन्यांची असल्याने भारताला आज सामना जिंकत मालिका जिंकण्याचीही संधी आहे.

एजबस्टनवर यजमान संघाचा विक्रम पाहता भारताला हा सामना जिंकणे कठीण आहे. इंग्लंडने येथे तीन टी२० सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांनीच विजय मिळवला आहे. २०१२मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, २०१४मध्ये भारताविरुद्ध आणि २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी हे तीन विजय मिळवले आहे. यामुळे कसोटीनंतर आता टी२०तही भारताची निराशा होणार का हे पाहण्याजोगे आहे.

दुसऱ्या टी२० सामन्यात भरताच्या संघात अनेक बदल दिसण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात विराट खेळला नव्हता यामुळे दीपक हुड्डाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्याने आयर्लंडच्या दौऱ्यात तुफानी फलंदाजी केली होती. त्याने मालाहिदे येथे झालेल्या त्या दोन टी२० सामन्यात १०४ धावा आणि ४७ धावांची खेळी केली होती. त्याच यशाच्या जोरावर त्याची इंग्लंडच्या दौऱ्यात निवड झाली. मात्र आता विराट परतण्याची चिन्हे दिसत असल्याने दीपक किंवा सूर्यकुमार यादवला बाकावर बसण्याची वेळ येणार आहे. दीपकने पहिल्या टी२० सामन्यात १७ चेंडूत ३३ धावा केल्या होत्या.

पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने अष्टपैलू खेळी केली होती. त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मधील पहिले अर्धशतक केले होते. नंतर त्याने गोलंदाजीतही चमक दाखवत ४ षटके टाकताना ४ विकेट्सही घेतल्या होत्या. यामुळे संघात त्याची जागा दुसऱ्या टी२०साठी पक्की आहे.

साउथम्पटन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगने २ विकेट्स घेत धमाकेदार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भुवनेश्वर कुमारनेही उत्तम गोलंदाजी केली. या सामन्यात ताबडतोब फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार आणि दीपक यांना ख्रिस जॉर्डने बाद केले होते. त्यातच इंग्लंजच्या फलंदाजांनी शेवटच्या तीन षटकामध्ये २० धावा देत भारताला आणखी मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले होते.

भारताने पहिला सामना जिंकला असून तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा पाहुण्या संघाचा हेतू असणार आहे. यासाठी भारतीय वरिष्ठ खेळाडू संघात खेळवले जाऊ शकतात.

दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), दीपक हुडा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

विराट अन् रोहितमध्ये रंगणार वरचढ ठरण्याची जंग! कोण बनणार खास ‘त्रिशतका’चा पहिला मानकरी?

भारताचे असे तीन फलंदाज जे वनडेत कधी बाद झाले नाहीत

रुट नंतर आता स्मिथनेही टाकले विराटला पिछाडीवर, शतक झळकावत रचलाय नवा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---