भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जेव्हा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात मैदानात उतरेल, तेव्हा त्याच्याकडे एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. त्याने जर या सामन्यात एक चौकार मारला, तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर सध्या ३२९६ धावा आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना शनिवारी (९ जुलै) बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. विराटने जर या सामन्यात ४ धावा केल्या, तर तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये स्वतःच्या ३३०० धावा पूर्ण करणारा दुसरा खेळाडू ठरू शकतो. विराटने जर मोठी खेळी केली, तर तो रोहित शर्मालाही मागे टाकू शकतो.
न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल सध्या टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. गप्टिलच्या नावावर ३२९९ धावा आहेत. यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे, ज्याच्या नावावर ३३३७ टी-२० आंतरराष्ट्रीय धावा आहेत. पहिल्या क्रमांकावरील रोहित आणि तिसऱ्या क्रमांकावरील विराटने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये प्रत्येक २९८ – २९८ चौकार मारले आहेत. जर या दोघांतील एखाद्याने २ चौकार मारले, तर तो ३०० चौकारांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू असेल.
टी-२० मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.
टी-२० मालिकेसाठी निवडला गेलेला इंग्लंड संघ – जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, रिचर्ड ग्लीसन, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, टायमल मिल्स, मैथ्यू पार्किंसन, जेसन रॉय, फिल साल्ट, रीस टॉपली, डेविड विली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रुट नंतर आता स्मिथनेही टाकले विराटला पिछाडीवर, शतक झळकावत रचलाय नवा विक्रम
भारत का इंग्लंड? दुसऱ्या टी२० सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार, वाचा एका क्लिकवर
शिखर धवनने उलघडले फलंदाजीच्या सरावाचे गूपित! म्हणाला, सुरुवातीपासूनच…