इंग्लंड आणि भारत यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवशी भारताने अतिशय दमदार सुरुवात केली. यात भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत भारताला शतकाच्या पार नेत भक्कम सलामी दिली. मात्र, त्यानंतर रोहित शर्मा (83) अँडरसनचा शिकार झाला आणि चेतेश्वर पुजारा (9) देखील अँडरसनकरवे स्वस्तात बाद झाला.
That's Stumps on Day 1 of the 2nd #ENGvIND Test at Lord's!
A solid outing with the bat for #TeamIndia, courtesy
1⃣2⃣7⃣* from @klrahul11
8⃣3⃣ from @ImRo45
4⃣2⃣ from @imVkohliScorecard 👉 https://t.co/KGM2YELLde pic.twitter.com/HpeU5SoWk5
— BCCI (@BCCI) August 12, 2021
यानंतर मात्र केएल राहुलने टिच्चुन फलंदाजी करत विराट कोहलीच्या साथीने आपले सहावे कसोटी शतक ऐतिहासिक लॉर्ड्सवर साजरे केले. या दरम्यान एकीककडून विराट कोहलीनेही दमदार फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, रॉबिनसनच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. विराट कोहली पुन्हा तीन अंकी धावसंख्या उभारण्यात अपयशी झाल्याने असंख्य चाहते नाराज झाले. मात्र, राहुल लोकेशने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी फलंदाजी केली.
पहिल्या दिवसअखेर राहुल अजिंक्य रहाणे (1) साथीने मैदानावर 127 धावांवर नाबाद राहिला. राहुलने त्याचे सहावे कसोटी शतक साजरे करत असतानाच अनेक रेकॉर्ड्सही बनवले आहेत. सलामीवीर म्हणून त्याने शतक साजरे करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली तर 1990 म्हणजे तब्बल 30 वर्षांनंतर लॉर्ड्सवर शतक साकारणारा तो पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज आहे.
What an innings!
Test century No.6 for KL Rahul 👏👏#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT86mZ0z pic.twitter.com/wTsKAdNuqX
— ICC (@ICC) August 12, 2021
इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक 2 बळी घेतले. अँडरसनने टीपलेले दोन महत्वाचे बळी म्हणजे शतकाच्या समिप पोहचलेला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा. हे दोन्ही महत्वाचे बळी टीपत अँडरसनने इंग्लंड संघाचा संकटमोटक हे नाव सार्थ ठरवले. तर दिवसाच्या अखेरीस भारताला विराट कोहलीरुपी तिसरा धक्का रॉबिनसनने दिला.
HUUUUUGE WICKET!! 🙌
Scorecard/Clips: https://t.co/GW3VJ3wfDv
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/bTIsg7pukq
— England Cricket (@englandcricket) August 12, 2021
—————————-
केएल राहुलने मार्क वूडला चौकार ठोकत त्याचे सहावे कसोटी शतक लॉर्ड्सवर साजरे केले आहे. तर विराट कोहली सध्या धावांवर नाबाद फलंदाजी करत आहे.
What an innings!
Test century No.6 for KL Rahul 👏👏#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT86mZ0z pic.twitter.com/wTsKAdNuqX
— ICC (@ICC) August 12, 2021
📸📸
@klrahul11 #TeamIndia https://t.co/OvD0ascaGV pic.twitter.com/st3dRt2p3I
— BCCI (@BCCI) August 12, 2021
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामी जोडीने भारतीय संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. पन्नाशीनंतर त्यांनी धावांची शंभरी पार करत मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल केली. मात्र अनुभवी गोलंदाज जेम्स अंडरसनने रोहितची विकेट घेत त्यांच्या विक्रमी भागिदारीवर अंकुश लावला.
सामन्यातील ४४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अंडरसनने ८३ धावांवर खेळत असलेल्या रोहितला त्रिफळाचीत केले. यासह १२६ धावांवर भारताची सलामी जोडी तुटली. १ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ८३ धावांचा आकडा गाठणाऱ्या रोहितचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले. रोहितनंतर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आला आहे.
You absolute beauty @jimmy9!! 😍
Scorecard/Clips: https://t.co/GW3VJ3wfDv
🏴 #ENGvIND 🇮🇳 |#RedForRuth pic.twitter.com/fXzZRb5YPY
— England Cricket (@englandcricket) August 12, 2021
दुसऱ्या सत्रापर्यंत भारतीय संघाने ५० धावांची भागिदारी पूर्ण केली आहे. तर सलामीवीर रोहितनेही अर्धशतकास गवसणी घातली आहे. ऑली रॉबिन्सनच्या षटकातील पाचव्या चेंडूवर (२४.५) एक धाव घेत त्याने अर्धशतक पूर्ण केले आहे. हे रोहितचे कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक आहे.
रोहितच्या अर्धशतकानंतर भारतानेही शंभर धावांकडे वाटचाल केली आहे. ३१ षटकानंतर भारतीय संघ ९२ धावांवर खेळत आहे.
FIFTY!
A fine half-century by @ImRo45 at Lord's. This is his 13th in Test cricket.
Live – https://t.co/KGM2YEualG #ENGvIND pic.twitter.com/oonVlwyWaj
— BCCI (@BCCI) August 12, 2021
इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाहुण्या भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर लवकरच लंच ब्रेक देण्यात आला. त्यानंतर रोहित-राहुलने आपली लय कायम राखत फळ्यावर संघाच्या ५० धावा नोंदवल्या आहेत. २१ षटकांनंतर भारतीय संघ बिनबाद ५६ धावांवर खेळत आहे.
रोहितने ४० धावांचा आकडा गाठला आहे. तर राहुल १० धावांवर खेळत आहे. या कसोटी मालिकेत रोहित आणि राहुलच्या जोडीने ५० धावांची भागिदारी करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात त्यांच्यात ९७ धावांची भागिदारी झाली होती.
Fifty-run stand comes up between Rohit and Rahul as play resumes after lunch #ENGvIND https://t.co/cSXRe8FIsx
— Cricbuzz (@cricbuzz) August 12, 2021
मात्र पावसामुळे १८.४ षटकांत खेळ थांबवण्यात आला होता. मात्र लगेचच पाऊस थांबल्याने पुन्हा खेळास सुरुवात झाली आहे. रोहित नाबाद ३५ धावा आणि राहुल नाबाद १० धावांवर खेळत आहेत. भारताने एकही विकेट न गमावता ४६ धावा केल्या आहेत.
यापूर्वीही पावसामुळे नाणेफेकीस २० मिनिटांचा विलंब झाला होता.
Rain has stopped but lunch has been taken with India on 46/0.
How good were Rahul and Rohit in that opening session #ENGvIND https://t.co/cSXRe8FIsx
— Cricbuzz (@cricbuzz) August 12, 2021
Rain stops play at Lord's 🌧️
India are 46/0 with Rohit Sharma unbeaten on 35* and KL Rahul keeping him company on 10*.
#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT86mZ0z pic.twitter.com/BBWrTtMDRq
— ICC (@ICC) August 12, 2021
दोन्ही संघात पाच कसोटी सामने खेळवले जाणार असून त्यातील पहिला सामना नॉटिंघममध्ये झाला. मात्र, पावसामुळे पहिला सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे आता दुसरा कसोटी सामना जिंकून कसोटी मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असणार आहे.
लॉर्ड्सवर पावसाच्या व्यत्ययामुळे टॉसला उशीर झाला. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघांना दुखापतींचा फटका बसला. त्यामुळे दोन्ही संघाने लॉर्ड्स टेस्टमध्ये अंतिम 11 खेळाडूंमध्ये बदल केले आहेत.
Here's overseas link for today's TMS broadcast:https://t.co/kgAxACDIIc#bbccricket #ENGvsIND pic.twitter.com/OtJvhpd933
— Test Match Special (@bbctms) August 12, 2021
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :
भारताची प्लेइंग इलेव्हन (11 खेळाडू) : केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
After a brief rain delay, we're ready to get underway at Lord's.
Who will impress during this Test? 🤔#LoveLords | #ENGvIND pic.twitter.com/5yTbITQnZu
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) August 12, 2021
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन (11 खेळाडू) : रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, हसीब हमीद, जो रुट, जोनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम करन, ओली रॉबिन्सन, मार्क वूड आणि जेम्स अँडरसन