इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे पाचवा कसोटी सामना सुरू आहे. यामध्ये यजमान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या प्रमुख फलंदाजांना लवकर बाद करत संघाला अडचणीत आणले. धावसंख्या ५ बाद ९८ अशी स्थिती असताना त्यानंतर आलेल्या रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) जोडीने विशेष खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असता भारत ७ बाद ३३८ धावा असा मजबूत स्थितीत आहे. तर पंत १४६ धावा करत बाद झाला असून जडेजा ८३ धावांवर खेळत आहे.
या पूर्वनियाजित पाचव्या कसोटी सामन्यात पंत-जडेजा जोडीने परदेशी मैदानावर सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकाच्या विकेसाठी संयुक्तपणे २२२ धावांची मोठी भागीदारी केली आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरूद्दीन या जोडीने १९९७मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी केली होती. त्यावेळी भारताने ५८ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या.
त्याचबरोबर पंत-जडेजा यांची २२२ ही भारताची कसोटीमधील संयुक्तपणे चौथी मोठी भागीदारी ठरली आहे. याआधी दिलीप वेंगसरकर आणि रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वानखेडे येथे २९८ धावांची भागीदारी केली होती.
इंग्लंडमध्ये सहाव्या विकेटची ही दुसरी मोठी भागीदारी ठरली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचा विक्रम थोडक्यात वाचला आहे. गॅरी सोबर्स आणि डेविड होलफोर्ड यांनी १९९६मध्ये २७४ धावांची भागीदारी केली होती. तसेच इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीय जोडीने केलेली ही चौथी मोठी भागीदारी ठरली आहे.
पंतचे हे कसोटीमधील पाचवे शतक ठरले आहे. २४ वर्षाच्या या खेळाडूने चार शतके परदेशी मैदानावर झळकावली आहेत. त्याच्याआधी २५ वर्षापेक्षा कमी वयाच्या फक्त दोन भारतीय खेळाडूंनी आशियाबाहेर कसोटी शतके ठोकली आहेत. यामध्ये तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांचा समावेश असून त्यांनी अनुक्रमे ७ आणि ५ शतके केली आहेत.
कसोटीत इंग्लंडमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा पंत दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने ८९ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. त्याच्याआधी अझरूद्दीन यांनी १९९० मध्ये लॉर्ड्स येथे ८७ चेंडूत शतक केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताची विजयी सलामी, पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेला ४ विकेट्सने झुकवत मालिकेत १-०ने आघाडी
दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली भारताचा सोपा विजय, डर्बीशायरला ७ विकेट्सने केले पराभूत
जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा