इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने नुकताच झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान मोठी प्रतिक्रिया दिली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह या सामन्यात संघाचे नेतृत्व करत आहे. शेवटच्या डावात इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले असून इंग्लंडने ७ विकेट्स राखून हे लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला आहे. दरम्यान भारतीय कर्णधाराच्या काही निर्णयांवर पीटरसन नाराज आहे.
जसप्रीत बुमराहने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली, पण कर्णधाराच्या रूपात त्याचे काही निर्णय चुकले. कर्णधाराच्या रूपात बुमराह विरोधी संघाच्या फलंदाजांना मर्यादित धावांवर रोखू शकला नाही. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने ४.४५ च्या स्ट्राईक रेटने २५९ धावा केल्या, ज्या कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने खूपच चांगला म्हणता येऊ शकतो. या धावांमध्ये एलेक्स लीस, जो रुट आणि जॉनी बेयरस्टो यांच्या अर्धशतकांचा समावेश होता.
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Peterson) या सामन्यात समालोचकाचे काम करत आहे. समालोचन करताना पीटरसन म्हणाला की, “मला नाही वाटत की, बुमराहची रणनीती योग्य आहे. मी ही गोष्ट खूप सन्मानपूर्व बोलत आहे. रिवर्स स्विंगि चेंडूला काहीच पर्याय नसतो की, तो फलंदाजासाठी सोपा बनेल. कारण यावेळी फलंदाज फक्त हाच विचार करत असतो की, चेंडू कोणत्या दिशेला स्विंग होईल. जेव्हा चेंडू ९० किमीच्या ताशी गतीने स्विंग होतो, तेव्हा फलंदाजी करताना चेंडूची दिशा ओळखणे सर्वात कठीण असते.”
पुढे बोलताना पीटरसन म्हणाला की, “भारताने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात खूप वेळ खेळपट्टीच्या मधल्या भागात क्षेत्ररक्षणासह आउटस्विंग आणि इनस्विंग गोलंदाजी केली. लॉन्ग ऑफ आणि लॉन्ग ऑनला त्यांचे क्षेत्ररक्षक होते, पण ते थोडे पुढे हवे होते. परंतु बुमराहने असे केले नाही आणि हा एकदम मुर्खपणा होता. दिवसाचा खेळ संपण्याच्या अर्धा तास आधी हा शुद्ध वेडेपणा होता. त्याने घाई-घाईत असे नव्हते केले पाहिजे. पण हो, त्याठिकाणी मी असतो, तर नक्कीच त्या खेळाडूंना आत बोलावले असते आणि नंतर त्याच्या डोक्यावरून हिट मारले असते कर्णधाराच्या रूपात बुमराह पुढे स्वतःमध्ये सुधार करेल, अशी अपेक्षा आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रुट-बेयरस्टोची शतकी खेळी आली भारताच्या विजयाआड
पंत-जडेजाच्या शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडने ७ विकेट्सने जिंकली पाचवी कसोटी; मालिकाही बरोबरीत
कोहली भारी का बाबर? पत्रकाराच्या प्रश्नावर बाबरचे हास्यास्पद उत्तर, पाहा व्हिडिओ