इंग्लंडचा संघ मागील काही दिवसांपासून भलताच लयीत दिसत आहे. त्यांनी घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन कसोटी सामने जिंकल्यावर नेदरलॅंड्स विरुद्ध तीन वनडे सामन्यात धावांचा पाऊस पाडला. ही मालिका त्यांनी ३-०ने जिंकली होती. कामगिरीत असेच सातत्य राखत त्यांनी हेडिंग्ले, लीड्स येथे झालेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी ७ विकेट्सने विजय मिळवला. भारताविरुद्धही असाच खेळ करणार, असे मत कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने मांडले आहे.
इंग्लंड संघाने नवीन कर्णधार-प्रशिक्षकाच्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली कसोटी चॅम्पियन न्यूझीलंड संघाचा ३-० असे पराभूत केले आहे. यानंतर इंग्लड विरुद्ध भारत एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना पूर्वनियोजित असून मागील वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आहे. कोरोनामुळे या मालिकेतील पाचवा सामना रद्द केला होता. त्यावेळी भारताने विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली खेळताना मालिकेत २-१ने आघाडी घेतली आहे.
हा कसोटी सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर स्टोक्सने त्याचा हेतू स्पष्टही केला आहे. तो म्हणाला, “भारतीय संघ बाकी संघापेक्षा निराळा आहे. आम्हाला भारताविरुद्धची मालिका अनिर्णीत करायची आहे. आम्ही ज्या विचाराने न्यूझीलंड विरुद्ध खेळ केला त्याच हेतूने आम्ही भारताविरुद्ध खेळणार आहोत.”
“न्यूझीलंडसारख्या संघाला पराभूत करून आम्हाला खूप आनंद झाला आहे. मी जेव्हा संघाचे नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी घेतली तेव्हा कसोटी क्रिकेटच्या बाबतीत लोकांचे मत बदलण्याचे प्रयत्न करायचा होता. हा विजयाचे संपूर्ण श्रेय संघसहकारी आणि प्रशिक्षकांना जाते,” असेही स्टोक्सने म्हटले आहे.
“या मालिकेतील ट्रेंट ब्रीजचा सामना संस्मरणीय ठरला आहे. यामध्ये २३ वर्षीय मॅथ्यू पॉट्सने उत्तम गोलंदाजी केली आहे. तसेच ३६ वर्षाच्या स्टुअर्ट ब्रॉडने देखील ४५ पेक्षा अधिक षटके टाकली आहेत. जॅक लीचने देखील २ सामन्यात १३ विकेट्स घेत प्रभावी गोलंदाजी केली आहे, असे म्हणत स्टोक्सने गोलंदाजांचे कौतुक केले आहे.
भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी २००७मध्ये संघाचा भाग असताना इंग्लंडच्या दौऱ्यात मालिका जिंकली होती. त्या दौऱ्याच तीन कसोटी सामने खेळले गेले होते. त्यातील दोन सामना अनिर्णीत राहिले, तर ट्रेंट ब्रीजचा सामना भारताने जिंकला होता. त्याचीच पुनरावृत्ती करण्याची संधी भारताकडे आहे.
त्याचबरोबर भारताला आयसीसी कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या शर्यतीत टीकून राहायचे असेल तर हा सामना जिंकणे म्हत्वाचे आहे. या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली आणि द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. इंग्लंडनेही स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम या नवीन कर्णधार-प्रशिक्षकाच्या जोडीची नियुक्ती केली आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत या मालिकेत कोणती नवीन कर्णधार-प्रशिक्षक जोडी जिंकणार हेे पाहण्याजोगे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ENGvsIND: ८६ कसोटींचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला मिळणार का संधी? भारतीय संघापुढे मोठा प्रश्न
IREvsIND: ऋतुराज दुखापतग्रस्त असताना पुण्याच्या भिडूला मिळू शकते संधी