इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) याच्यांत एजबस्टन येथे मालिका निर्णायक सामना सुरू आहे. यामध्ये भारताचे नेतृत्व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) करत आहे. त्याने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशा खेळ केला आहे. त्याने भारताच्या पहिल्या डावात उत्तम फलंदाजी करत नंतर गोलंदाजीतही पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडचा दुसरा डाव सुरू असून त्याने दोन विकेट्स घेत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
बुमराहने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सलामीवीर झॅक क्रॉलीला बाद करत सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांत खेळताना १०० कसोटी विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने सेना देशांत १०० कसोटी विकेट्स घेण्याचा कमी वयाच्या गोलंदाजाचा विक्रम आपल्या नावे केला आहे. आधी हा विक्रम पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) यांच्या नावावर होता. बुमराहने वयाच्या २८ वर्ष २११व्या दिवशी हा विक्रम रचला आहे. अक्रम यांनी २८ वर्ष २३०व्या दिवशी सेना देशांमध्ये १०० कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम रचणारे ते पहिलेच आशियाचे गोलंदाज ठरले होते.
सेना देशांत जसप्रीत बुमराहने कसोटीमध्ये घेतलेल्या विकेट्स-
३७* इंग्लंड
३२ ऑस्ट्रेलेिया
२६ दक्षिण आफ्रिका
८ न्यूझीलंड
बुमराहने सेना देशांत ४७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. याबरोबरच तो कमी डावांमध्ये १०० विकेट्स आकडा पार करणारा सहावा आशियाचा गोलंदाज ठरला आहे. श्रीलंकेचा दिग्गज मुथया मुरलीधरन (Muttiah Mulralitharan) याने २८ डावांमध्ये आणि भारताकडून जहीर खान (Zaheer Khan) याने ४४ डांवामध्ये ही कामगिरी केली आहे.
सेना देशांत कसोटीमध्ये कमी डावांत १०० विकेट्स घेणारे पहिले सहा खेळाडू-
२८ मुथया मुरलीधरन
३२ वसीम अक्रम
३९ इमरान खान
४४ जहीर खान
४७ जसप्रीत बुमराह
बुमराहने आतापर्यंत इंग्लंडमध्ये सर्वाधिक ९ कसोटी सामने खेळताना १७ डावांमध्ये ३७ विकेट्स घेतल्या आहेत. २०१८मध्ये कसोटीत पदार्पण केल्यानंतर त्याने ३० सामन्यात १२८ विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात यजमान संघ वरचढ असल्याचे दिसून येत आहेत. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ४१६ आणि दुसऱ्या डावात २४५ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवरच संपुष्टात आला तर दुसऱ्या डावामध्ये त्यांनी ३ विकेट्स गमावत २५९ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भारताला ७ विकेट्स तर इंग्लंडला ११९ धावा करण्याची आवश्यकता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खबर, लक्ष्मणची संघाचा प्रशिक्षक म्हणून निवड
अन्य संघांप्रमाणे पाकिस्तान याबाबतीत राहिला मागे; स्वत: कर्णधारानेच केलं मान्य
‘भारताने सामन्यात चमकदार कामगिरी केली’ माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केली संघाची पाठराखण