इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना एजबस्टन क्रिकेट ग्राऊंड, बर्मिंघम येथे खेळला जाणार आहे. हा सामना मागील वर्षी झालेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आहे. कोरोनामुळे भारतीय संघाला मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले होते. तेव्हा केएल राहुल संघात होता, मात्र दुखापतीमुळे तो या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर विराट कोहली (Virat Kohli) याच्या निराशाजनक फलंदाजी याबद्दल भारताच्या अनेक माजी खेळाडूंनी चिंता व्यक्त केली आहे. त्याच्याविषयी भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)ने मोठे विधान केले आहे.
नोव्हेंबर २०१९ पासून विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. सेहवागने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी विराटचा बचाव केला आहे. या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी करेल, अशी आशा विरेंद्र सेहवागने व्यक्त केली आहे.
सामन्यापूर्वी भारताचा मध्यम फळीतील विश्वासाचा फलंदाज विराट कोहली याचा खराब फॉर्म चर्चेचा विषय बनला आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १५व्या हंगामामध्ये कोहलीने फक्त २२च्या सरासरीने धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर तो खातेही न उघडताच तीनवेळा तंबूत परतला होता.
मात्र, विराट शतक कधी झळकावेल याबद्दल सेहवागने काही सांगितले नाही. सेहवाग म्हणाला, “विराटने शेवटचे शतक केव्हा केले ते मला आठवत नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत मोठी खेळी करावी.”
कोहलीचे वाईट दिवस संपतील अशी आशा सेहवागने व्यक्त केली. तो म्हणाला, “आता वाईट दिवस गेले असे वाटते. त्याने सराव सामन्यात अर्धशतक करत चांगली कामगिरी केली आहे. यावरून त्याची फलंदाजीची लय परत आली असे दिसत आहे.” कोहलीने सराव सामन्याच्या पहिल्या डावात ३३ आणि दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या आहेत.
विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. त्याने लिसेस्टरशायर विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात शानदार पुनरागमन केले आहे. त्याची ही कामगिरी पाहता इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माचे कर्णधारपद लवकरच जाणार, विरंद्र सेहवागने दिले संकेत
VIDEO। जो रुटवर पडला प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमचा प्रभाव, अतरंगी शॉट मारत सर्वांना केल अचंबित
न्यूझीलंडच्या खेळाडूचा लाजवाब पराक्रम; सचिन, पॉटिंग, डिविलियर्स यांनाही पुरून उरला






