एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND)पाचवा कसोटी सामना सुुरू आहे. या सामन्यात भारताचे कर्णधारपद जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्याकडे सोपवले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. या सामन्यात त्याला विराट कोहली (Virat Kohli) याची चांगली साथ मिळाली आहे. विराट या सामन्यात मेंटॉरची भुमिका बजावत आहे. त्याने बुमराहचे नेतृत्वामध्ये मार्गदर्शन केले आहे.
उत्तम शॉट्स मारणारा बुमराह क्षेत्ररक्षण लावताना संघर्ष करताना दिसला. अशा स्थितीत विराटने पुढे येत बुमराहला क्षेत्ररक्षण लावण्यास मदत केली आहे. त्यानंतर विराटने त्याच्याशी काही चर्चाही केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या इंग्लंडच्या या पहिल्या डावात विराटने मैदानावर जबाबदारी घेतल्याने चांगले झाले.
विराट हा भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. याचाच फायदा संघाला रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत होत आहे. यावर्षीच विराटने कर्णधारपदाचा त्याग केला असून त्याने ७ वर्ष संघाचे नेतृत्व केले होते. या सात वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला. टी२० आणि वनडेच्या कर्णधारपदावरूनही तो पायउतार झाल्याने संघात आता तो फलंदाज म्हणून उपस्थित आहे.
विराट कोहलीचे भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन…#म #मराठी #Cricket #TeamIndia #ViratKohli #INDvENG #ENGvIND pic.twitter.com/QEDZRVWfrZ
— Maha Sports (@Maha_Sports) July 3, 2022
मालिका निर्णयाच्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मॅथ्यू पॉट्स आणि जेम्स अँडरसन यांनी भारताच्या पहिल्या चार फलंदाजांना लवकरच तंबूत पाठवले. भारताचा पहिला डाव ५ बाद ९८ धावा असताना रिषभ पंत-रवींद्र जडेजा जोडीने २२२ धावांची भागीदारी करत संघाला तीनशेच्या पार पोहोचवले. या दोघांनीही या सामन्यात शतके झशकावली आहेत. नंतर बुमराहने झटपट खेळी केली. त्याने नाबाद ३१ धावा १६ चेंडूत केल्या आहेत.
भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या आहेत. त्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने ५ विकेट्स गमावत ८४ धावा केल्या आहेत. बुमराहने तीन तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली आहे. हा सामना मालिका जिंकण्यासाठी भारताला जिंकणे अथवा अनिर्णीत राखणे आवश्यक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अठरा वर्षे भारतीय संघाची सेवा केल्यानंतर कार्तिककडे नेतृत्त्वपद; भावूक ट्वीट करत म्हणाला, ‘गर्व आहे’
नशीब असावे तर असे..! बुमराहला नो बॉलमुळे मिळाल्या इंग्लंडच्या २ महत्त्वपूर्ण विकेट्स, पाहा Video
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या रोहित कधी होतोय टीम इंडियात सामील