इंग्लंड आणि भारत (ENGvsIND) यांच्यात एजबस्टन येथे पाचवा कसोटी सामना सुरू आहे. १ जुलैपासून सुरू झालेल्या या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंडच्या यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांच्यात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शाब्दिक चकमक झाल्याचे पाहिले गेले होते. या वादानंतर बेयरस्टोने झंझावाती शतक ठोकले. त्यातच तो बाद झाल्यावर विराटने ज्याप्रकारे बेयरस्टोच्या विकेटचे सेलेब्रेशन केले त्याचे व्हिडिओ भन्नाट व्हायरल झाला आहे.
मोहम्मद शमी ५५वे षटक टाकायला आला. त्याने पहिल्याच चेंडूत बेयरस्टोला विराटकरवी झेलबाद केले आहे. त्याने झेल घेताच मोठ्याने न ओरडता अनोख्या पद्धतीने बेयरस्टोला निरोप दिला आहे. बेयरस्टोने या सामन्यात १४० चेंडूत १०६ धावा केल्या आहेत.
Kohli takes a sharp catch as Shami strikes on the first ball of a new spell to remove the danger man 🤩🔥
Well played, Jonny Bairstow 👏🏼
Tune in to Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN) & Sony Ten 4 (TAM/TEL) – (https://t.co/tsfQJW6cGi)#ENGvINDLIVEonSonySportsNetwork #ENGvIND pic.twitter.com/B0aOJ7u8Nc
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 3, 2022
मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केला गेला होता. मालिकेतील पहिल्या चार सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) भारताचा कर्णधार होता, पण मालिकेतील पाचव्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नेतृत्व करत आहे.
भारताने पहिल्या पाच विकेट्स अवघ्या ९८ धावांवर गमावल्या होत्या. त्यानंतर रिषभ पंत (१४६) आणि रवींद्र जडेजा (१०४) यांच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी इंग्लंडला संघ फलंदाजीसाठी आला. इंग्लंडच्या पहिल्या पाच विकेट्स अवघ्या ८३ धावांवर पडल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडलने २७ षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या ८५ धावा केल्या होत्या. बेयरस्टो आणि कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) खेळपट्टीवर अनुक्रमे १२ आणि शून्य धावांसह कायम होते.
इंग्लंडने सहा विकेट्स गमावत २५० धावा केल्या आहेत. यामुळे भारताकडे १६६ धावांची आघाडी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटची स्लेजिंग टीम इंडियाला नडली? शाब्दिक चकमकीनंतर बेयरस्टोचे झंजावाती शतक
पीवायसी रावेतकर फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत सामुराईज, टायटन्स, निंजाज संघांचे विजय
महिला हॉकी विश्वचषक: इंग्लंड विरुद्ध टोकियो ऑलम्पिकमधील पराभवाचा बदला घेण्यास भारतीय संघ सज्ज