---Advertisement---

Video: जडेजाने शतक ठोकताच विराटही झाला भलताच खूष, रिऍक्शन पाहून तुम्हीही कराल प्रशंसा

On: शनिवार, जुलै 2, 2022 7:39 PM
---Advertisement---

भारतीय संघ आणि इंग्लंड (ENGvsIND) यांच्यात एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे कसोटी मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी रिषभ पंत (Rishabh Pant) याने ८९ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. यामुळे भारताने तीनशेचा आकडा पार केला. त्याने २० चौकार आणि ४ षटकार मारत १४६ धावा केल्या आहेत. शनिवार (२ जुलै) या सामन्याचा दुसरा दिवस असून या दिवशी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने शतक ठोकले आहे. त्याने शतक करताच पवेलियनमध्ये बसलेल्या संघसहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) याने दिलेल्या प्रतिक्रियेचे व्हि़डिओ भन्नाट व्हायरल झाले आहेत.

जडेजाने पहिल्या दिवशी पंतसोबत २२२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. त्याने केलेले शतक हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले आहे. त्याने १८३ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. यामुळे भारताच्या पहिल्या डावात ४१६ धावा झाल्या आहेत.

जडेजा १०४ धावा करत जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याचे हे परदेशी भुमीवरील पहिले कसोटी शतक ठरले आहे. त्याने शतक झाल्यावर नेहमीप्रमाणे तलवारबाजीच्या अंदाजात सेलेब्रेशन केले. तर पवेलियनमध्ये असणाऱ्या संघसहकाऱ्यांनीही टाळ्या वाजवत आनंद साजरा केला आहे. त्यामध्ये विराटने उभे राहुन मोठ्याने ओरडत त्याच्या शतकाचा जल्लोष केला आहे. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या सामन्याच्या पहिल्या दिवशी पंतने केलेल्या शतकाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या सेलेब्रेशनचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. जडेजाने पहिल्या दिवशी पंतसोबत आणि दुसऱ्या दिवशी कर्णधार जसप्रीत बुमराह सोबत तुफानी फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याने १३ चौकार मारले आहेत.

बुमराहने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आहे. त्याने १९३.७५च्या स्ट्राईक रेटने १६ चेंडूत ३१ धावा कुटल्या आहेत. नंतर गोलंदाजीला येत त्याने इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर ऍलेक्स लीज आणि झॅक क्राउली यांना एकेरी धावेवर बाद करत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आनंदाला उधाण! बुमराहच्या बेधुंद फटकेबाजीचा डगआऊटमध्ये जोरदार जल्लोष, प्रशिक्षकांची रिऍक्शन लक्षवेधी

बुमराहने इंग्लंडकडून ५५० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिवसा दाखवलं चांदणं, लज्जास्पद वर्ल्ड रेकॉर्ड नावावर

कर्णधार जसप्रीत बुमराहकडून इंग्लंडच्या ब्रॉडची ‘युवी स्टाईल’ धुलाई, पाहा त्या रोमहर्षक ओव्हरचा थरार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---