इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस (०१ जुलै) रोमांचक राहिला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या भारतीय संघाने ३३८ धावा फलकावर लावल्या आहेत. ७३ षटके खेळताना ७ विकेट्स गमावत त्यांनी ही धावसंख्या केली आहे. भारताकडून रविंद्र जडेजा ८३ धावा आणि मोहम्मद शमी शून्य धावेवर नाबाद परतले आहेत.
यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आणि भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताकडून शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरली. मात्र अवघ्या ४६ धावांवर दोघेही माघारी परतले. गिल वैयक्तिक १७ धावा आणि पुजारा १३ धावा करू शकला. मधल्या फळीत हनुमा विहारी (२० धावा) आणि विराट कोहली (११ धावा) यांनाही विशेष योगदान देता आले नाही.
98/5 ➡ 338/7 🔥
Rishabh Pant and Ravindra Jadeja led India's incredible fightback 💪#WTC23 | #ENGvIND | 📝 Scorecard: https://t.co/wMZK8kesdD pic.twitter.com/owBvXjXsn1
— ICC (@ICC) July 1, 2022
मात्र यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने संघाचा मोर्चा सांभाळला. रविंद्र जडेजाला साथीला घेत त्याने मोठ्या धावा जोडल्या. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान पंतने त्याचे शतक पूर्ण केले. १११ चेंडू खेळताना ४ षटकार आणि २० चौकारांच्या साहाय्याने त्याने १४६ धावांची खेळी केली. यादरम्यान श्रेयस अय्यरने (१५ धावा) विकेट गमावली. तसेच शार्दुल ठाकूरही पुढे स्वस्तात माघारी परतला.
दिवसाखेर जडेजा आणि मोहम्मद शमीने खिंड लढवली. आता सर्वांची नजर जडेजाच्या शतकावर आहे. जडेजा शतक करण्यापासून १७ धावांनी दूर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरचा झेल टिपताना जगाने पाहिला ‘उडता बिलिंग्स’, पाहा व्हिडिओ
पंतने एका दगडात मारले तीन पक्षी! शतक झळकावत ठरलाय धोनीपेक्षाही महान
अवघ्या चोविसाव्या वर्षी रिषभ पंतने मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा ‘हा’ विक्रम, वाचा एका क्लिकवर