इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅनचेस्टर येथे तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने झटपट दोन विकेट्स घेत भारताला उत्तम सुरुवात करून दिली. हार्दिक पंड्यानेही या सामन्यात उल्लेखनीय गोलंदाजी करत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याची ही वनडे कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली आहे. योगायोग म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील सर्वोत्कृष्ठ कामगिरी त्याने इंग्लंड विरुद्धच इंग्लंडमध्येच केली आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने आजच्या (१७ जुलै) सामन्यात ७ षटके टाकली आहेत. यातील ३ षटके निर्धाव टाकली असता एकूण २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत. ही त्याची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याने जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन आणि मोईन अली या चार विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये हार्दिकने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने २०१८मध्ये इंग्लंड विरुद्धच्या ट्रेंट ब्रीज, नॉटींघम येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कारकिर्दीत प्रथमच पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. या सामन्यात त्याने २८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना भारताने २०३ धावांनी जिंकला होता.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये जानेवारी, २०१६मध्ये पदार्पण करताना हार्दिकने या प्रकरातील सर्वोत्तम कामगिरीही इंग्लंड विरुद्ध केली आहे. त्याने ७ जुलै, २०२२ला झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत पहिल्या टी२० सामन्यात ३३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी त्याने जेसन रॉय, लिविंगस्टोन, सॅम करण आणि डेविड मलानला बाद केले होते. या सामन्यात त्याने ५१ धावा करत आंतरराष्ट्रीय टी२०चे पहिले अर्धशतक केले होते. हा सामना भारताने ५० धावांनी जिंकला होता.
हार्दिकने दुखापतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केले आहे. आयपीएल २०२२च्या हंगामात गुजरात टायटन्सला पदार्पणातच विजेतेपद मिळवून देणे ते आयर्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघाचे विजयी टी२० मालिकेत नेतृत्व करणे, यावरून यंदाचे वर्ष त्याच्यासाठी विशेष ठरत आहे हे दिसून आले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मॉर्गनने कमावलं, बटलरने गमावलं! तब्बल सात वर्षानंतर इंग्लंडवर आली अशी नामुष्की
सिराजचा बटलरवर ‘डबल वार’! इंग्लिश कर्णधाराला आणले अडचणीत
VIDEO: एकाच ओव्हरमध्ये जडेजाचे दोन ‘सुपरमॅन कॅच’; दिली सामन्याला कलाटणी