---Advertisement---

खळबळजनक खुलासा! लॉर्ड्सच्या लॉन्ग रूममध्ये भिडले होते कोहली अन् रूट, कारणही होते मोठे

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 3:36 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना बुधवारीपासून (२५ ऑगस्ट) सुरू झाला आहे. सामन्याच्या ठीक आधी एक खुलासा झाला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांच्यात दुसऱ्या सामन्यानंतर लाॅर्ड्सच्या लाॅन्ग रूममध्ये वाद झाल्याचे समोर येत आहे. टेलिग्राफ स्पोर्टने हे वृत्त दिले आहे. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता.

खेळाडूंमध्ये संघर्षाला सुरुवात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी झाली होती. जसप्रीत बुमराहने फलंदाजीसाठी आलेल्या जेम्स अंडरसनला एकापाठोपाठ एक बाउंसर चेंडू टाकले. त्यामुळे या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर भारताच्या फलंदाजीवेळी इंग्लंडने त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा कोहली-अंडरसन नंतर बुमराह, बटलर आणि मार्क वुड एकमेकांसोबत भिडले होते.

टेलिग्राफ स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहद्वारे जेम्स अंडरसनला टाकलेल्या बाउंसर्सनंतर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये संघर्ष झाला. रूट, कोहली आणि दोन्ही संघातील बाकीच्या खेळाडूंना मैदानातून बाहेर जाताना लाॅर्ड्सच्या लाॅन्ग रूममध्ये वाद करताना पाहिले गेले होते. रूममध्ये भारतीय अधिकारी, सहकारी स्टाफ आणि खेळाडू भरलेले होते. याच ठिकाणी भारताच्या विजयानंतर खेळाडूंचे जोरदार स्वागतही केले गेले होते.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट ज्याने या सामन्यात १८० धावा केल्या. तो इंग्लंडचा पहिला डाव संपेपर्यंत मैदानावर होता आणि ड्रेसिंग रूममध्ये जाताना त्याने शाब्दिक वाद केला होता. शांत स्वभावासाठी ओळखला जाणाऱ्या जो रूटने भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर स्वत:वरचे नियंत्र गमावले होते. इंग्लिश क्रिकेटसाठी पवित्र मानले जाणारे लाॅर्ड्स लाॅन्ग रुम शक्यतो नेहमीच एमसीसी सदस्यांनी भरलेले असते. संघ त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये वेगवेगळ्या पायऱ्यांनी जातात.

सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितले होते की, “भारतीय संघाला इंग्लंडने चेतावणी दिली होती.पाचव्या दिवशीच्या सकाळी जे झाले त्याच्यानंतर हा विजय खूप समाधानकारक आहे. आम्ही दाखवले की चेतावणी दिल्यावर आमचा संघ माघार घेणाऱ्यांमधला नाहीये. आम्ही एकत्र खेळतो. आम्ही जिंकण्यासाठी खेळतो. आम्ही कोणत्याच विरोधकाला आम्हाला हलक्यात घेऊ देणार नाही.”

कोहली पुढे बोलताना म्हणाला, “मैदानात जे बोलले जाते, जे केले जाते. ते तुम्हाला आतिरिक्त प्रेरणा देत असते. आमच्यासाठी हा नवीन कसोटी सामना होता. आमच्यासाठी ही एक संधी होती की, आम्ही एक संघाच्या रूपात काय करू शकतो.”

दुसऱ्या सामन्यातील या गोंधळानंतर आता हेडिंग्ले स्टेडियमवर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. दोन्ही संघांचे खेळाडू पुन्हा समोरासमोर भिडणार आहेत. चाहत्यांना आणखी एक रोमांचक कसोटी सामना पाहायला मिळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटर मंधाना आहे कसोटी क्रिकेटची चाहती, पाहायला आवडते कोहली-अँडरसनमधील वैर

ना धोनी ना अजून कोणी; भारतीय कसोटी इतिहासात ‘हा’ विक्रम करणारा यष्टीरक्षक पंत असेल पहिलाच

लॉर्ड्स कसोटी जिंकत WTC गुणतालिकेत भारताचे वर्चस्व, अव्वलस्थानी केला ताबा; इंग्लंड संघ मात्र घसरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---