---Advertisement---

भारतीय क्रिकेटर मंधाना आहे कसोटी क्रिकेटची चाहती, पाहायला आवडते कोहली-अँडरसनमधील वैर

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 2:48 PM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामी फलंदाज स्मृती मंधाना तिच्या क्रिकेटमधील चांगल्या प्रदर्शन आणि तिच्या लुक्ससाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. तिला तिच्या लुक्समुळे ‘नॅशनल क्रश’ असेही म्हटले जाते. नुकताच तिचा आर अश्विनसोबतचा चर्चा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अश्विनने क्रिकेट पाहण्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतानाने सांगितले की, तिने कसोटी क्रिकेटची निवड केली. मात्र कसोटी क्रिकेटचा उल्लेख करताना तिने केलेल्या विधानाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

तिला कसोटी क्रिकेट पाहायला जास्त आवडते. कसोटी क्रिकेटमध्येही तिला विराट कोहली-जेम्स अंडरसन यांच्यातील वाद सर्वात जास्त आवडतो.

भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज स्मृती मंधानाने नुकत्याच झालेल्या इंग्लंविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. भारतीय संघ या सामन्यात पराभवाच्या वाटेवर असताना, खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे सामना अनिर्णीत राहिला होता. स्मृती मंधानाने तिच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात इंग्लंडविरुद्ध २०१४ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याने केली होती.

स्मृती मंधानाने आर अश्विनसोबत त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, ती जास्त क्रिकेट पाहत नाही. मात्र तिला कसोटी सामने पाहायला आवडतात. ती म्हणाली, “मी जास्त क्रिकेट पाहणाऱ्यांमधील नाहीये. पण जेव्हा भारत खेळतो तेव्हा मी सर्व कसोटी सामने पाहते. जर असे काही असेल जे पाहायला मला आवडते, जसे की जेम्स अंडरसन तुम्हाला गोलंदाजी करतो. त्यादरम्यान होणारा वाद पाहायला जास्त मजा येते.”

स्मृती मंधानाने पुढे बोलताना सांगितले की, “काही महिला क्रिकेटपटूंना क्रिकेट पाहायला खूप आवडते. मी जेव्हा सराव करून परतते तेव्हा क्रिकेट जास्त पाहू शकत नाही. पण, ज्या सामन्यांना मी मिस करत नाही आणि निश्चित पाहते, ते म्हणजे कसोटी सामने असतात. जर काही सुटले तर मी हायलाइट्स पाहते.”

स्मृतीने बोलताना युवा मुलींना एक संदेश दिला आहे. ती म्हणाली की, “मी स्वत: एक मुलगी असून क्रिकेटमध्ये आले आणि भारताचे सर्व प्रकारांत प्रतिनिधित्व केले. येथे खूप चांगले वातावरण असते आणि आज ज्याप्रकारे महिला क्रिकेट वाढत आहे आणि पुढे चालले आहे, त्यामुळे युवा मुलींनी पुढे आले पाहिजे.”

वर्ष २०१३ मध्ये भारतीय संंघासाठी पदार्पण करणारी स्मृति मंधानाचे नाव आज जगातल्या स्टार महिला क्रिकेटपटूंमध्ये घेतले जाते. तिने नुकत्याच झालेल्या द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेत ७ डावांमध्ये १६७ धावा केल्या. तिने तिचा संघ साउथर्ण ब्रेव्हसाठी (southern brave) या धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

दंगल दंगल…! हॉटेलच्या कॉरिडॉरमध्येच अश्विनच्या चिमुकल्या मुलींमध्ये रंगला कुस्तीचा डाव

‘त्यांचे गोलंदाज कोणत्याही परिस्थितीत जिंकू शकतात’; भारताच्या गोलंदाजांना घाबरला इंग्लंडचा अव्वल फलंदाज

लॉर्ड्स कसोटी जिंकत WTC गुणतालिकेत भारताचे वर्चस्व, अव्वलस्थानी केला ताबा; इंग्लंड संघ मात्र घसरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---