इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याने जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने सामन्यात एकूण ७ षटके टाकली आणि २४ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनामुळे त्याला सामनावीर निवडले गेले. हार्दिक या सामन्यात चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकला. तत्पूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही ४ विकेट्सचा हॉल घेतला होता. मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या फिटनेसमध्ये चांगलीच सुधारणा पाहिली गेली आहे.
खेळताना १०० टक्के क्षमतेने खेळायला आवडते
तिसरा एकदिवसीय सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) माध्यमांशी बोलताना म्हणाला, जर त्याला नियमितपणे गोलंदाजी करता आली, तर चांगले वाटते. तो म्हणाला की, “सर्वात आधी माझ्या गोलंदाजीविषयी बोलतो. प्रत्येक मालिका संपल्यानंतर मी चार पाच दिवस सराव करतो, कारण यामुळे फिटनेस चांगली राहते. मला १०० टक्के क्षमतेसह खेळायला आवडते, कारण यामुळे मला त्या सर्व गोष्टी करण्याची संधी मिळते, ज्या मी आज केल्या.”
हार्दिक पुढे म्हणाला की, “आयपीएल संपल्यानंतर मी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. मी एका सामन्यात गोलंदाजी केली आणि पुढच्या दोन सामन्यात गोलंदाजी केली नाही. एका गोलंदाजाच्या रूपात माझ्यासाठी हे महत्वाचे आहे की, मी गोलंदाजी करत रहावी. ”
‘त्यामुळे’ हार्दिकला मिळाला आत्मविश्वास –
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार विकेट्स घेतल्यानंतर आत्मविश्वास मिळाल्याचे हार्दिकने स्पष्ट केले, “माझ्यासाठी नियमितपणा मिळवणे खूप महत्वाचे आहे आणि मी यावर काम करतो. मी शक्यतो सामन्याच्या आधी सराव करत नाही, पण मी पूर्ण प्रयत्नांसह काही तास गोलंदाजी केली. तिथूनच मला लय मिळाली आणि नंतर चार विकेट्स घेतल्यामुळे सर्वकाही बदलले. यामुळे मला नियमितपणा आणि आत्मविश्वास मिळाला.”
हार्दिकने पुढे बोलताना असेही म्हटला की, तो पूर्ण गतीसह गोलंदाजी करू शकतो, पण ही गोष्ट परिस्थितीतवर अवलंबून असते. त्याला असे वाटते की, पूर्ण जोर लावून गोलंदाजी करण्यापेक्षा विचारपूर्वक गोलंदाजी केल्यामुळे जास्त फायदा होतो.
उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २५९ धावा केल्या. प्रत्युत्तारत भारतीय संघाने हे लक्ष्य ४२.१ षटकात गाठले. हार्दिकव्यतिरिक्त रिषभ पंतनेही विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. पंतने ११३ चेंडूत नाबाद १२५ धावा ठोकल्या. या विजयानंतर भारताने एकदिवसीय मालिका १-२ अशा अंतराने जिंकली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
संघ ठरले आता ठिकाण अन् वेळही निश्चित! वाचा भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
जोकोविचलाही वाटतयं विराटने लवकर फॉर्ममध्ये यावे! कृतीतून दर्शवला पाठिंबा