इंग्लंड आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात मंगळवारी (१२ जुलै) झाली. मालिकेतील पहिल्या सामना द ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला असून यामध्ये इंग्लंडची वरची फळी पूर्णपणे अपयशी ठरली. सलामीवीर जेसन रॉय, जो रुट आणि बेन स्टोक्स यांनी शून्यावर विकेट्स गमावल्या. या तिघांनी एकही धावा न केल्यामुळे इंग्लंडसाठी सामन्याची सुरुवात खूपच खराब झाली आणि सोबतच एका नकोशा विक्रमाची नोंदही झाली.
ही पहिली वेळ आहे, जेव्हा इंग्लंडचे दिग्गज फलंदाज जेसन रॉय (Jason Roy), जो रुट (Joe Root), आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी एकाच वनडे सामन्यात शून्यावर विकेट गमावली आहे. रॉय आणि रुट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या चेंडूवर बाद झाले, तर अष्टपैलू बेन स्टोक्स मोहम्मद शमी (Mohammad Shami) याच्या चेंडूचा शिकार बनला. या तिघांनी विकेट गमावली तेव्हा संघाची धावसंख्या अवघी ७ धावा होती. या ७ धावा जॉनी बेयरस्टोने केल्या होत्या. नंतर बुमराहने संघाची धावसंख्या १७ असताना बेयरस्टोला देखील तंबूत धाडले.
#EnglandVSIndiaOnSonyLIV#INDvsENG #jaspritbumrah #bumrah #ODI#Root #jasonroy
Jasprit Bumrah gets Roy and Root in his first over. Root also departs for a duck, marvelous over by Bumrah. pic.twitter.com/OJjbE1bgdI— iconic ???? (@iconic_17) July 12, 2022
बुमराहने टाकलेल्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर जेसन रॉयने विकेट गमावली. हा चेंडू बेयरस्टोच्या बॅटच्या आतल्या किनाऱ्याला लागला आणि थेट स्टंपमध्ये घुसला. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने जो रुटला यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून झेलबाद केले. बेन स्टोक्सची विकेट तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर गेली. मोहम्मद शमीने त्यालाही यष्टीरक्षक रिषभ पंतच्याच हातून बाद केले. या चार विकेट्सनंतर जसप्रीत बुमहारने डावातील आठव्या षटकात अजून एक महत्वाचा फलंदाज तंबूत धाडला. आठव्या षटकातील पाचव्या चेंडूवर लियाम लिविंगस्टोनही बाद झाला. तेव्हा संघाची धावसंख्या २६ होती आणि भारताला त्यांची पाचवी विकेट मिळाली.
Root, Stokes and Roy… all go for a duck!
Whatta a start to the Indian inning!
Two for Bumrah and one for Shami!ENG truly in tatters…#ENGvIND #INDvENG #JoeRoot #JasonRoy #ODIs #ShikharDhawan #1stODI #ViratKohli #BoomBoompic.twitter.com/IHaS87xWSW
— OneCricket (@OneCricketApp) July 12, 2022
दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजी आक्रमण आणि विशेषतः जसप्रीत बुमराहने योग्य ठरवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पेढे वाटा पेढे! केकेआरच्या ‘या’ क्रिकेटरच्या घरी आला नवा पाहुणा, पत्नीने गोंडस मुलाला दिला जन्म
ऑस्ट्रेलियाचा घमंड भारताने वेळोवेळी तोडलाय..! India vs Australia रायवलरीचे किस्से





