इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील शेवटचा दिवस खूपच रोमांचक राहिला आहे. भारतीय संघ चौथ्या दिवशी त्यांच्या दुसऱ्या डावात अवघ्या २४५ धावा करून सर्वबाद झाला. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री एजबस्टन कसोटीदरम्यान स्काय स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री पॅनलचा भाग आहेत. शास्त्री भारतीय संघाने दुसऱ्या डावात ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे नाखुश दिसले.
कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ४१६ धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २८४ धावांवर गुंडाळला गेला होता. पहिल्या डावात भारतीय संघाने १३२ धावांची आघाडी घेतली होती आणि संघ भक्कम स्थितीत होता. शास्त्रींच्या मते दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या करून भारतीय संघ कसोटी सामना नावावर करू शकत होता. परंतु दुर्दैवाने दुसऱ्या डावात भारताला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.
दुसऱ्या डावात भारतीय संघ २४५ धावा करून सर्वबाद झाला आणि इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य दिले. चौथ्या दिवासाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने त्यांच्या दुसऱ्या डावात ३ विकेट्सच्या नुकसानावर २५९ धावा केल्या. रवी शास्त्री (Ravi Shashtri) यांच्या मते दुसऱ्या डावात भारतीय खेळाडू आवश्यकतेपेक्षा जास्त बचावात्मक झाले होते.
रवी शास्त्री म्हणाले की, “त्यांनी दोन सत्र फलंदाजी करणे गरजेचे होते आणि मला वाटते की ते जास्त बचावात्मक फलंदाजी करत होते. ते घाबरलेले होते. विशेषकरून दुपारच्या जेवणानंतर.”
शास्त्रींनी पुढे बोलताना असेही म्हटले की, “विकेट गमावल्यानंरही ते जोखीम घेऊ शकत होते. खेळात त्यावेळी धावा खूप महत्वाच्या होत्या आणि मला वाटते की, ते खूप बचावात्मक झाले होते. विकेट्स खूप लवकर गमावल्या आणि इंग्लंडला फलंदाजीसाठी पुरेपूर वेळ देऊन बसले”.
दरम्यान, मागच्या वर्षी भारतीय संघ जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर आला होता, तेव्हा पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण होऊ शकली नाही. मालिकेतील पहिले चार सामने खेळले गेले असून भारत २-१ अशा आघाडीवर होता. या चार सामन्यांमध्ये रवी शास्त्री संघाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि विराट कोहली संघाचा कर्णधार होता.
परंतु आता मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात खेळला तर जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत होता. विराटनंतर रोहित शर्माला संघाचा नियमित कर्णधार बनवले गेले, पण या कसोटी सामन्यापूर्वी त्याला कोरोना झाल्यामुळे या सामन्यात बुमराह संघाचे नेतृत्व करत होता. बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला हा सामना जिंकण्यात अपयश आले आणि भारताने २-२ ने मालिका गमावली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डची मोठी डील! पुढील पाच वर्षांमध्ये खेळाडूंना मिळणार ‘इतके’ कोटी
कोहलीनंतर आता अँडरसनबद्दल बोलताना सेहवागची घसरली जीभ, म्हणाला ‘आता तो म्हातारा झालाय’
भारतासाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खबर, लक्ष्मणची संघाचा प्रशिक्षक म्हणून निवड