रविवारी (१७ जुलै) खेळल्या गेलेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील निर्णायक सामन्यात भारताने विजय मिळवला आणि एकदिवसीय मालिका नावावर केला. एकदिवसीय मालिकेतील पहिला आणि शेवटचा सामना भारताने जिंकला असून १-२ अशा अंतराने ही मालिका नावावर केली. तिसऱ्या सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ताबडतोड फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि शतक देखील पूर्ण केले. सामना संपल्यानंतर पंत आणि भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शांस्त्री यांच्यातील जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळाली.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ चांगला राहिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात भारताने अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या.ऑस्ट्रेलियामध्ये पहिली कसोटी मालिकाही भारताने शास्त्रींच्याच कार्यकाळात जिंकली होती. रिषभ पंत (Rishabh Pant) यानेही ऑस्ट्रेलिया दौरा चांगलाच गाजवला होता. रविवारी पंतने पुन्हा एकदा त्याच पद्धतीची फलंदाजी करून इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेत भारताला विजय मिळवून दिला. पण शास्त्री यादरम्यान प्रशिक्षकाच्या नाही, तर समालोचकाच्या भूमिकेत होते.
पंतने या सामन्यात भारतासाठी ११३ चेंडूत सर्वाधिक १२५ धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. सामना जिंकण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या पंतला विजयानंतर बक्षीस म्हणून शॅम्पेनची एक बाटली देण्यात आली. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर पंत ही शॅम्पेनची बॉटल घेऊन ड्रेसिंग रुमकडे जाऊ लागला. परंतु तितक्यात रवी शास्त्रींशी त्याची भेट होते. शास्त्री पंतची गळाभेट घेतात आणि चर्चा झाल्यानंतर शेवटी जाताना त्याच्या हातातील शॅम्पेनची बाटली स्वतःसोबत आणतात.
शास्त्री जेव्हा पंतच्या हाततून शॅम्पेनची बाटली घेतात, तेव्हा दोघेही मोठ्याने हसत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यावेळी स्टॅन्ड्समधील चाहत्यांनीही चांगलाच गोंधळ घातला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता. चाहते यावर वेगवळ्या प्रतिक्रिया देत आहे.
Pant offering his champagne to Ravi Shastri#INDvENG #OldTrafford #Pant #TeamIndia pic.twitter.com/n9HguNNuID
— Tejesh R. Salian (@tejrsalian) July 17, 2022
सामन्याचा विचार केला, तर भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यांचा संघ ४५.५ षटके खेळून २५९ धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारातने हे लक्ष्य ४२.१ षटकात आणि पाच विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. हार्दिक पंड्याने ७ षटकात २४ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या, तर फलंदाजी करताना ५५ चेंडूत ७१ धावा केल्या. या जबरदस्त प्रदर्शनासाठी हार्दिकला सामनावीर निवडले गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ENGvsIND: रिषभ पंतच्या ‘या’ कृतीमुळे आली धोनीची आठवण!
तिसऱ्या वनडेपूर्वी पंतला मिळालेला खास सल्ला, भारताचा माजी दिग्गजाचे ट्वीट व्हायरल
यंदाचा इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी ठरला यशस्वी! रचली विक्रमांची मालिका, यादी पाहाच