इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका भारताने १-२ अशा अंतराने जिंकली आहे. मालिकेतील शेवटचा सामना जरी भारताने गमावला असला, तरी पहिल्या दोन सामन्यात मात्र इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील शेवटचा सामना नॉटिंघममध्ये खेळला गेला असून कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात मिळालेल्या पराभवाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. रोहितच्या मते, इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर दबाव बनवला होता. लक्ष्य चांगले होते, पण काही धावा कमी पडल्या.
सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बोलत होता. तो म्हणाला की, “मला वाटते हे एक चांगले लक्ष्य आहे, पण आम्ही ते गाठू शकलो नाही. ज्या पद्धतीने आम्ही लढलो त्याचा मला अभिमान आहे. सूर्यकुमारची खेळी अप्रतिम होती. मी त्याला खूप काळापासून पाहत आलो आहे. त्याला टी२० हा प्रकार आवडतो आणि त्याच्याकडे व्यापक रेंजचे शॉट्स आहेत. जेव्हापासून आम्ही त्याला संघात घेतले आहे, तेव्हापासून तो अधिकच मजबूत होत चालला आहे.” सूर्यकुमारने या सामन्यात ५५ चेंडूत १४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११७ धावांचे योगदान दिले.
“त्यांनी (इंग्लिश फलंदाज) त्यांच्या फलंदाजीमुळे आमच्यावर दबाव बनवला. चांगल्या भागीदारीमुळे आम्हाला बॅकफुटवर ढकलले. तुम्हाला हे लक्ष्य गाठायचे असते. आम्ही खेळाडूंना आजमावण्याच्या प्रयत्नात होतो, जर ते ४ षटके गोलंदाजी करू शकत असतील तर. आमच्याकडे एका समुहाच्या रूपात काम करण्यासाठी गोष्टी आहेत, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत गोष्टी खूप चांगल्या राहिल्या आहेत. आम्हाला एक गोष्ट पुन्हा-पुन्हा करायची नाहीये. प्रत्येक सामन्यात सुधारणा करायची आहे,” असेही रोहित पुढे म्हणाला.
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तारात भारतीय संघ मात्र हे लक्ष्य गाठू शकला नाही. भारतीय संघ मर्यादित २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावांपर्यंत मजल मारू शकला. इंग्लंडने हा शेवटचा सामना १७ धावांनी जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आरं तुझं चाललंय तरी काय? धावा काढणे तर सोडाच, विराट आता हातातला कॅचही सोडतोय
हार्दिकने केली विराट, रोहितसाठी शिवीगाळ? जाणून घ्या नक्की काय झाले
टी२०मध्ये शंभरी करण्यात भारताचेच खेळाडू वरचढ, पाहा किती केली शतके