---Advertisement---

हार्दिकने केली विराट, रोहितसाठी शिवीगाळ? जाणून घ्या नक्की काय झाले

On: सोमवार, जुलै 11, 2022 2:31 PM
Rohit Sharma Virat Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या सध्या त्याच्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर हार्दिकने मोठी विश्रांती घेतली होती, त्यानंतर आयपीएल २०२२ पासून हार्दिक त्याच्या जुन्या अंदाजात परतल्याचे दिसत आहे. मधल्या काळात हार्दिकने आयर्लंडविरुद्धच्या विजयी टी-२० मालिकेत संघाचे नेतृत्वही केले. सध्या हार्दिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी असा दावा करत आहेत की, हार्दिकने सामन्यादरम्यान विराट किंवा रोहितसाठी अपशब्द वापरला आहे.

व्हिडिओ शेअर करत असे सांगितले जात आहे की, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) किंवा विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासाठी अपशब्द वापरला आहे. सोशल मीडियावर #HardikAbusedRohit असा ट्रेंडही सुरू आहे. या व्हिडिओत हार्दिकचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाहीये. याच कारणास्तव अशी पुष्टी करणे शक्य नाहीये की, हार्दिकने सामन्यादरम्यान असे कुठलेही कृत्य केले आहे.

एका नेटकऱ्याने दावा केला आहे की, हार्दिक गोलंदाजी करत होता, तेव्हा विराट सीमारेषेजवर क्षेत्ररक्षणासाठी उभा होता आणि प्रेक्षकांकडे पाहून डान्सही करत होता. विराटचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले की, हार्दिक पंड्याने कर्णधार रोहितला शिवी दिली. तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने दावा केला की, हार्दिकने उच्चारलेला अपशब्द विराटसाठी होता. दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान घडलेल्या या प्रसंगावर एका न्यूजरूममध्ये चर्चाही झाली. चर्चेदरम्यान एक पत्रकार असे म्हटला आहे की, त्याच्या मते हार्दिक डीआरएसच्या निर्णयामुळे असे म्हटला होता आणि १५ सेकंदाच्या या व्हिडिओविषयी चुकीचे अंदाज बांधले जात आहेत. पत्रकाराच्या मते हार्दिक डीआरएसविषयी म्हणाला की, जेव्हा मी गोलंदाजी करत असेल, तेव्हा माझे ऐकज जा, दुसऱ्या कुणाचे नाही.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हार्दिक सामनावीर ठरला होता. त्याने या सामन्यात ३३ चेंडूत ५५ धावा केल्या होत्या, तर गोलंदाजीत ३३ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या होत्या. मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते, पण शेवटच्या सामन्यात संघ १७ धावांनी पराभूत झाला. परिणामी टी-२० मालिका भारताने १-२ अशा अंतराने जिंकली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

दिग्गज खेळाडू हरपला! तीन बलाढ्य संघांविरुद्ध शतक ठोकणारा माजी कर्णधाराचे निधन, क्रीडाविश्व दु:खात

महिला हॉकी विश्वचषक: यजमान संघाने केलेल्या पराभवामुळे टीम इंडिया बाद फेरीतून बाहेर

सूर्यकुमारचं शतक खरंच स्पेशल! शतकी खेळीसह राहुलला तर पछाडलच, पण विजय हजारेंचीही केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---