रविवारी (१० जुलै) इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळला गेला. टी-२० मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले आणि २-० अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा सामना इंग्लंड संंघासाठी प्रतिष्ठेचा बनला. इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि २०० पेक्षा मोठे लक्ष्य उभे केले. यादरम्यान चर्चा झाली ती, लियाम लिविंगस्टोनच्या एका जबरदस्त षटकाराची.
तसे पाहिले तर, इंग्लंडचा दिग्गज लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) नेहमीच त्याच्या मोठ्या षटकारांसाठी चर्चेत राहिला आहे. भारताविरुद्धच्या या तिसऱ्या टी-२० सामन्यात देखील त्याने असाच एक षटकार मारला, जो स्टॅन्ड्समध्ये ८० मीटर लांब जाऊन पडला. लिविंगस्टोनच्या या षटकाराची चांगलीच चर्चा होत आहे. चाहत्यांनी हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल केलाय.
OUT THE GROUND! ????????
Scorecard/clips: https://t.co/AlPm6qHnwj
???????????????????????????? #ENGvIND ???????? | @liaml4893 pic.twitter.com/mragtr14CW
— England Cricket (@englandcricket) July 10, 2022
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित २० षटकांमध्ये इंग्लंडने ७ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. या धावा करण्यासाठी वरच्या फळीतील फलंदाज डेविड मलानने सर्वाधिक ७७ धावांचे योगदान दिले. यादरम्यान त्याच्या ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. लियाम लिविंगस्टोन देखील संघासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. लिविंगस्टोनने २९ चेंडूत ४ जबरदस्त षटकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा ठोकल्या.
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज आवेश खान आणि उमरान मलिक यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. आवेश खानने या सामन्यात तब्बल १४७ किमी ताशी गतीने चेंडू टाकला. यापूर्वी भारताचा एकही वेगवान गोलंदाज टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एवढ्या गतीने चेंडू टाकू शकला नव्हता.
प्रत्युत्तारत भारतीय संघ जेव्हा फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा वरच्या फळीतील फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. रिषभ पंतला या सामन्यात पुन्हा एकदा सलामीसाठी पाठवले गेले होते, पण तो फक्त एक धाव करून बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी ११-११ धावा करून बाद झाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकापूर्वी आयसीसीने शेअर केला पंतचा खासम खास व्हिडिओ, कॅप्शनही आहे दमदार
उमरानच्या गतीला तोडच नाही..! इंग्लंडमध्येही फेकला भारताकडून सर्वात वेगवान चेंडू, स्पीड तर पाहा
Third T20 | टॉस तर जिंकला, आता सामना जिंकत इंग्लंड राखणार का आपली प्रतिष्ठा?






