---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये, ‘हे’ ४ महारथी ठरु शकतात मॅचविनर

On: बुधवार, ऑगस्ट 11, 2021 8:53 AM
Photo Courtesy : Twitter/ jasprit bumrah & Virat Kohli
---Advertisement---

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून (12 ऑगस्ट) ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. नॉटिंघममधील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. मात्र, भारतीय संघाला आता लॉर्ड्सवरील दुसरी कसोटी जिंकून 1-0 अशी आघाडी घ्यायची आहे.

इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यातही भारताचे प्रमुख 4 खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मॅचविनर असल्याचे सिद्ध करू शकतात.

रोहित शर्मा

‘हिटमॅन’ रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो. सध्या रोहित शर्मा कमालीचा फॉरेममध्ये आहे. रोहितने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद 36 आणि 12 धावा केल्या होत्या. मात्र, लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितकडून धमाकेदार फलंदाजी अपेक्षित आहे.

Rohit Sharma

विराट कोहली

कर्णधार विराट कोहली ही भारतीय क्रिकेट संघाची सर्वात मोठी ताकद आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहली शून्यावर बाद झाला. मात्र, तो पुनरागमन करण्यात तज्ज्ञ आहे. विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मॅच विनर सिद्ध होऊ शकतो.

गेल्या काही वर्षापासून, कोहलीने फलंदाजीत एकही शतक केलेले नाही, त्यामुळे सध्या त्याला धावांची भूक आहे. अशा परिस्थितीत कोहली इंग्लंडसाठी मोठा धोका ठरू शकतो. तसेच तो त्याच्या बॅटने टीकाकारांना शांत करू इच्छितो.

हेही वाचा – जसप्रीत बुमराहचे ‘ते’ गूढ ट्विट होतेय व्हायरल

रिषभ पंत

गेल्या एका वर्षात रिषभ पंत हा भारतीय संघासाठी मॅच-विनर बनला आहे. जो स्वतः संपूर्ण सामना फिरवू शकतो. रिषभ पंत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या यष्टीरक्षणाच्या कौशल्यात मोठी सुधारणा झालेली दिसत आहे. तसेच फलंदाजीतही तो कमाल करताना दिसत आहे.

त्यामुळे लॉर्ड्सवरील सामन्यात सर्वांच्या नजरा रिषभ पंतवर असतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिषभ पंतने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आणि त्याने इंग्लंडविरुद्धही त्याचा उत्कृष्ट फॉर्म सुरूच ठेवलाय.

जसप्रीत बुमराह

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला बॅकफूटवर आणले होते. बुमराहने पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल 9 बळी घेत इंग्लिश संघाचे कंबरडे मोडले होते.

जसप्रीत बुमराह भारतीय संघाच्या वेगवान आक्रमणाची सर्वात मोठी ताकद आहे. कसोटीत त्याने 22.14 च्या सरासरीने 92 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहच्या शैलीमुळे त्याच्या चेंडूंना गती आणि उसळी मिळेल. ज्यामुळे इंग्लंडचे फलंदाज अडचणीत येऊ शकतात.

अधिक वाचा –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---