---Advertisement---

‘रोहित नसला तर विराटला करा कॅप्टन’, ट्वीटरवर चाहत्यांची एकसुरात मागणी

---Advertisement---

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला एकमात्र कसोटी सामना, तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार आहे. पण त्यापूर्वी चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कोरोनाची लागण झाली असून तो या सामन्यात खेळणार की नाही अशा चर्चेला उधान आले आहे. त्यातच चाहत्यांनी अनोखी मागणी समोर येत आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या उपकर्णधाराचे नाव घोषित केले नव्हते. जर रोहित या सामन्यात नाही खेळला तर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्यासाठी एक मोठी संधी तयार होताना दिसत आहे. त्यात चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘विराटला कर्णधार करावे’ अशा मागणींचा धुमाकुळ घातला आहे.

https://twitter.com/yashhverse/status/1540932806511316992?s=20&t=dACSBsMayVEL7LEyKt_L9A

विराट कोहली (Virat Kohli) याने या वर्षाच्या सुरूवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभव झाल्याने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा त्याग केला होता. या त्याच्या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

यावर्षाच्या आयपीएल (इंडियल प्रीमियर लीग) हंगामात विराटच्या बॅटमधून अधिक धावा निघाल्या नाही. त्याच्या या निराशाजनक कामगिरीवर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी आक्षेप घेतला होता. मात्र त्याची मैदानावरील उर्जा संघासाठी महत्वाची ठरते. तो ज्याप्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन देतो ते त्या खेळाडूंसाठी लक्षणीय ठरते.

विराट हा कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने ६८ कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. त्यातील ४० सामने भारत जिंकला तर १७ सामने गमावले आहेत. त्याच्या कर्णधारपदाखाली ११ सामने अनिर्णात राहिले आहेत. त्याने कर्णधार असताना २० कसोटी शतके ठोकली आहेत. तो जेव्हा कर्णधार होता तेव्हा भारत सलग पाच वर्षे आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहिला आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने २०१८-१९मध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड हा मागील वर्षाच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि मालिका निर्णायक सामना आहे. पाच सामन्याच्या या कसोटी मालिकेत भारत २-१ने आघाडीवर आहे. एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे होणाऱ्या या कसोटी सामन्यात भारताला मालिका जिंकण्यासाठी हा सामना जिंकावा किंवा अनिर्णीत ठेवावा लागेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

उमरान मलिकची पदार्पणाची प्रतिक्षा संपणार? कर्णधार हार्दिक पांड्याने दिले संकेत

‘मी सांगतोय ना, उमरानला टी२० विश्वचषकात घ्या’, भारताच्या माजी कर्णधाराचे विधान

ज्या मैदानावर आलं अपयश तिथेच मिळवलं अविस्मरणीय यश; चंद्रकांत पंडितांना अश्रू अनावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---