भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू असून सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी एक मोठी बातमी आली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर संघाच्या सपोर्ट स्टापमधील शास्त्रींव्यतिरिक्त ३ सदस्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना विलगीकरणात ठेवले गेले आहे. यामध्ये गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रिशिक्षक आर श्रीधर यांचा समावेश आहे. शास्त्री कोरोना पाॅझिटिव्ह आल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरील खेळाडूंसोबत असलेल्या खेळाडूंच्या कुटुंबीयांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे
या घटनेनंतर आकाश चोप्रांनी खेळाडूंचे कुटुंब आणि त्यांची मुलं यांच्यविषयी चिंता व्यक्त केली आहे, जे इंग्लंड दौऱ्यावर खेळाडूंसोबत आहेत. त्यांना लहान मुलांची जास्त चिंता वाटत आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेले खेळाडू आणि त्याचा परिवार आणि सपोर्ट स्टाफ या सर्वांचे कोरोना लसीकरण झालेले आहे. मात्र, कर्णधार विराट कोहली, उमेश यादव, अजिंक्य रहाणेसहीत इतरही खेळाडूंची मुलं अजून खूप लहान असून काहींचा नजीकच्या काळातच जन्म झालेला आहे. त्यामुळे त्यांचा लसीकरणाशी कसलाच संबंध येत नाही, पण कोरोनाशी त्यांचा संबंध येऊ शकतो. म्हणून सद्यस्थितीत या लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आकाश चोप्राने ट्विटरवर व्यक्त केली चिंता
आकाश चोप्राने यासंबंधी ट्विट करत म्हटले आहे की, ‘दौऱ्यावर गेलेल्या संघात कोरोना केस सापडणे तणावपूर्ण आहे, पूर्णपणे लसीकरन केलेल्या लोकांसाठीही. रवी शास्त्रींनीही लस घेतलेली होती, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली. लक्षात ठेवा की, जास्त खेळाडू हे त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, लहान मुलंही आहेत.”
Covid positive cases in your touring party can be very stressful…even for the fully vaccinated people. Ravi was and breakthrough infection has happened. Remember most players are with their families…little ones. Kudos to the team for not allowing that to distract them #EngvInd
— Aakash Chopra (@cricketaakash) September 6, 2021
आकाश चोप्राच्या या ट्विटनंतर चाहत्यांनाही खेळाडूंच्या परिवार आणि लहान मुलांची चिंता सतावत आहे. असे असले तरी त्यांना कोरोना लागण होन्याची शक्यता फारच कमी आहे. तरीदेखील भारतीय संघात कोरोनाने पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. कसोटी मालिकेतील एक सामना बाकी असून त्या पार्श्वभूमीवर चाहत्यांच्या मनात शंका आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला धक्का! शेवटच्या कसोटीतून रवी शास्त्री बाहेर, मोठे कारण आले समोर
फॉर्मात परतण्यासाठी सेहवागचा रहाणेला रामबाण उपाय; म्हणाला, ‘आई-वडिलांसाठी मैदानावर…’
चौथी कसोटी जिंकण्याच्या मार्गावर असलेली ‘विराटसेना’ काळजीत, रोहित-पुजाराच्या दुखापतीवर आली अपडेट