भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील लॉर्ड्सला झालेल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाकडे आता जगातले सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज आहेत असे मानले जात आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये पहिल्या दोन्ही कसोटीत ४ मुख्य वेगवान गोलंदाजांसह खेळला. याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनीही कौतुक केले आहे.
भारतीय संघाने १९८६ मध्ये लाॅर्ड्स स्टेडियमवर क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय मिळवला होता. त्यावेळी दिलीप वेंगसरकर त्या संघाचा भाग होता. त्यांनी या सामन्यात अप्रतिम शतकी खेळी केली होती. दिलीप वेंगसरकर लाॅर्ड्सच्या मैदानावर सलग ३ शतक करणारे एकमेव विदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे लाॅर्ड्सवर मिळालेल्या विजयाचे महत्व त्यांना चांगलेच माहिती आहे.
६५ वर्षीय वेंगसरकर भारतीय संघाला लाॅर्ड्सवर मिळालेल्या विजयाबद्दल द टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “विदेशात आता जी भारतीय क्रिकेटची तुतारी वाजत आहे, त्याचे श्रेय वेगवान गोलंदाजी विभागाला जाते, जे भारतीय संघाचा धाक वाढवत आहेत. वेगवान गोलंदाजीत क्रांती आणून आपण जो आपल्या संस्कृतीत बदल केला आहे, तो अप्रतिम आहे.”
भारतासाठी ११६ कसोटी आणि १२९ एकदिवसीय सामने खेळलेले वेंगसरकर पुढे बोलताना म्हटले, “कदाचीत ही पहिलीच वेळ असावी जेव्हा आपण ४ वेगवान गोलंदाजांसह खेळलो. मी असे म्हणेल की हा नवा भारत आहे, कारण याआधी आपण कधिच असे केले नव्हते. जेव्हा मी इंग्लंडमध्ये १९७९ मध्ये माझा पहिला विश्वचषक खेळलो होतो, तेव्हा आम्ही ३ फिरकी गोलंदाजांसह खेळलो होतो. खेळाच्या आगोदर हा आमच्या रणनीतीमध्ये खुप मोठा बदल होता. कारण फिरकी गोलंदाजांनी २० मधले १९ विकेट घेतले होते.”
वेंगसरकर यांनी विराट कोहली आणि त्याच्या संघाच्या आक्रमक स्वभावाची प्रशंसा केली. ते म्हणाला जेव्हा विरोधी संघ नेहमी तुमच्यावर आक्रमक राहायला बघत असेल तर तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल. तुम्ही नेहमी शांत राहून समोरच्याला वरचढ होण्याची संधी नाही देऊ शकत.
महत्त्वाच्या बातम्या –
“तू का रागावली आहेस?” पंतप्रधान मोदींनी पदकाविना परतलेल्या विनेश फोगटचे केले सांत्वन
भारताविरुद्ध लढण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; ‘या’ दोन दिग्गज गोलंदाजांची मालिकांमधून माघार