इंग्लंड आणि भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी तयारी करत आहे. हा सामना २५ ऑगस्टपासून लीड्समध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघाचे सर्व खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने सराव करत आहेत. यादरम्यान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने त्याचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.
पंतने शेअर केलेल्या व्हिडिओत तो त्याच्या पायाचा व्यायाम करताना दिसत आहे. पंतने त्याचा सहकारी खेळाडू अक्षर पटेलला उचलून व्यायाम केला आहे. या व्हिडिओत पंत एका बेंचवर बसलेला दिसत आहे आणि त्याने त्याच्या मांडीवर वजन ठेवलेले आहे. त्यानंतर त्याने अक्षर पटेलला त्या वजनावर उभे केले आणि पायाचा व्यायाम केला. पंतने त्याच्या पायाच्या दुसऱ्या मांसपेशींवरही काम केले. पंतचा हा व्यायाम करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
रिषभ पंतच्या पायाच्या मांसपेशी एमएस धोनीसारख्याच मजबुत आहेत. त्याच्या मदतीने तो मोठे शाॅट खेळू शकतो.
कसोटी मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पंतचे प्रदर्शन खराब
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. मात्र, संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे प्रदर्शन या दोन्ही सामन्यांत काही खास नव्हते. पंतने या मालिकेत खेळलेल्या ३ डावांत २८ च्या सरासरीने ८४ धावा केल्या आहेत. त्यात त्याची सर्वाधिक धावसंख्या ३७ आहे. भारतीय संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात पंतकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.
पंतप्रमाणेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसुद्धा मालिकेत मोठी खेळी करू शकला नाही. त्याने त्याच्या ३ डावांत २०.६६ च्या सरासरीने ६२ धावा केल्या आहेत. त्याव्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्या रहाणे यांची सरासरीही २५ पेक्षा कमीच आहे. मात्र, या दोघांनी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आणि पुन्हा फाॅर्मात आल्याचे संकेत दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
केवळ १५ कसोटींचा अनुभव असूनही भारताविरुद्ध का खतरनाक सिद्ध होईल मलान? घ्या जाणून
राहुल द्रविड नाही घेणार भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची जागा! ‘मोठे’ कारण आले पुढे
टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर; स्मिथ-फिंचचे पुनरागमन तर, ‘हा’ नवा शिलेदारही सहभागी






