इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर २५ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शाॅ हे दोघे संघाच्या प्लेइंग ११ च्या निवडीसाठी उपलब्ध असतील. दरम्यान इंग्लंडमध्ये असलेले सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शाॅ यांनी एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत पृथ्वी शाॅ आणि सुर्यकुमार यादव हे दोघेही बाजीगर सिनेमातील एका काॅमेडी सीनवर अभिनय करत आहेत. व्हिडिओत दोघे एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहेत. त्यांच्या हा व्हिडिओ चाहत्यांना खुप आवडला आहे. याआगोदर याच दोन खेळाडूंनी आमिर खान आणि सलमान खानच्या अंदाज अपना अपना सिनेमातील एका सीनवर बनवलेला एक काॅमेडी व्हिडिओ शेयर केला होता.
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फटकेबाजीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकणाऱ्या या शिलेदारांना अभिनय करताना पाहून चाहते त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. काहींनी तर या मजेशीर व्हिडिओवर ‘हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है’, या हिंदी गाण्यातील ओळी लिहित प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/reel/CSq3tJ9oTxW/?utm_source=ig_web_button_share_sheet
इंग्लंड आणि भारत यांच्यतील कसोटी मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला. या सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागण्याची शक्यता होती. मात्र मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमधील संघर्ष शिगेला पोहोचला होता. त्यानंतर आता मालिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्ट ते २९ ऑगस्टदरम्यान लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
यावेळी सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शाॅ भारतीय प्लेइंग इलेव्हनच्या निवडीसाठी उपलब्ध आहेत. भारताच्या श्रीलंका दौऱ्यावरून इंग्लंडला पोहोचलेल्या या दोन्ही क्रिकेटपटूंनी १४ दिवसांचे विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर दोघे संघासोबत सामील झाले आणि सराव सुरू केला आहे. त्यांना दुखापतग्रस्त शुबमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडमधील टीम इंडियाच्या मागील तिन्ही विजयाचे ‘अँडरसन कनेक्शन’, वाचा सविस्तर