भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेत संघांच्या खेळाडूंची जेवढी चर्चा होते तेवढीच क्रिकेटचा चाहता जार्वोचीही चर्चा झाली. तो या मालिकेतील सामन्यांदरम्यान वारंवार मैदानात घुसला आहे. त्याचे संपूर्ण नाव डॅनियल जार्विस असे आहे. लाॅर्ड्स आणि हेडिंग्ले कसोटीनंतर हा चाहता द ओव्हलवरच्या चौथ्या कसोटीमध्ये दिसला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तो मैदानात धावत आला आणि नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या जाॅनी बेयरस्टोला धक्का दिला. त्याने केलेल्या या कृत्यामुळे जाॅनी बेयरस्टो रागवलेला दिसला, पण तो काहीच करू शकला नाही.
ही पहिली वेळ नाही, जेव्हा जार्वोसारखे चाहते सामन्यादरम्यान मैदानात आले आहेत. याआधीही अनेकदा असे चाहते मैदानात आलेले आहेत. १९७७ मध्ये न्युझीलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एका सामन्यात असाच एक चाहता मैदानात आला होता. त्या चाहत्यानेही अगडी जार्वोप्रमाणेच कृत्य केले होते. मात्र, यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ग्रेग चॅपलने त्याला चांगलाच धडा शिकवला होता.
या सामन्यात हा चाहता वेगाने धावत मैदानात आला आणि फलंदाजी करणाऱ्या ग्रेग चॅपलकडे गेला. हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. ग्रेग चॅपलने त्याला एका हाताने पकडले आणि दुसऱ्या हाताने बॅटच्या मदतीने त्याची धूलाई करत राहिला. त्याने या चाहत्याला चांगलाच चोप दिला. फटके पडू लागल्यावर त्या चाहत्याने कसेबसे ग्रेग चॅपेलच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रेग चॅपेलने त्याला लवकर सोडले नाही. त्यानंतर तो कसाबसा त्याच्या तावडीतून स्वतची सुटका करुन पळाला. पण पुढे स्टेडियमच्या गार्ड्सनी त्याला पकडले.
That time Greg Chappell took on a pitch invader and gave him a batting lesson he probably hasn't had since being a kid.
Unfortunately he was run-out next ball. #jarvo69 #jarvo #EngvInd pic.twitter.com/91js6JEyvu
— Jason Ford (@TheFordFactor) September 3, 2021
ग्रेग चॅपलचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जार्वोच नव्हे तर कोणत्याही दर्शकाचे असेल मैदानात घुसण्याचे धाडस होणार नाही. असले तरी जार्वोने मालिकेत चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. मात्र, त्याला हे महागात पडले आहे. त्याला ओव्हलवरील कृतीनंतर लंडन पोलिसांनी खेळाडूंना मारहाणीचा प्रयत्न केल्याच्या संशायावरून ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बेटा, तू फक्त मोहालीत असं करून दाखव, मग पाहा’; वारंवार मैदानात घुसणाऱ्या जार्वोला सेहवागचा इशारा
चुकीला माफी नाही! भारत-इंग्लंड सामन्यात सलग तिसऱ्यांदा घुसणाऱ्या जार्वोवर अटकेची कारवाई
जार्वो आला अन् थेट पळत जाऊन बेअरस्टोला धडकला, भारताचा ब्रिटिश चाहता तिसऱ्यांदा घुसला मैदानात