इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना २ सप्टेंबरपासून (गुरुवारी) सुरु झाला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव केवळ १९१ धावांवर गुंडाळला असून इंग्लंडचा संघही दिवसाखेर ३ बाद ५३ धावा अशा स्थितीत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने केवळ १५ धावा देत इंग्लंडच्या २ फलंदाजांना बाद केले आहे. त्यातही त्याने या दोन्ही विकेट एकाच षटकाच घेतल्या. तरीही यानंतर त्याने जोरदार आनंद व्यक्त करण्याऐवजी तो एका वेगळ्याच अंदाजात दिसला आहे.
जसप्रीत बुमराह नेहमी विकेट घेतल्यानंतर जोरदार जल्लोष व्यक्त करताना दिसतो. तसेच या संपूर्ण मालिकेतही तो अशाप्रकारे आनंद व्यक्त करताना दिसला आहे. मात्र, चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्सची विकेट घेतल्यानंतर त्याने कसलाही आनंद व्यक्त केला नाही आणि नेहमीप्रमाने उत्साहातही दिसला नाही. तो विकेट घेतल्यानंतर एकाच जागी उभा राहून शांततेत बर्न्सकडे पाहत होता.
बुमराहचा हा नवीन अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांच्याही त्याच्या या बदललेल्या अंदाजाविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याच्या या बदललेल्या अंदाजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bumrah send back the both England openers in One Over. #ENGvIND #Cricketpic.twitter.com/kBqdHnwvwV
— . (@vidfilesana) September 2, 2021
इंग्लंडसाठी त्यांच्या सलामी फलंदाजांनी मागच्या सामन्यात महत्वाची खेळी केली होती. मागच्या सामन्यात दोघांनीही अर्धशतक केले होते. मात्र, या सामन्यात बुमराहने रॉरी बर्न्सला ५ धावा आणि हसीब हमीदला ० धावांवर तंबूत माघारी धाडले. त्याने या दोन्ही विकेट्स एकाच षटकात घेतल्या. याव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज उमेश यादवने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला २१ धावांवर बाद केले.
कसोटी मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर असून चौथा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यात मिजय मिळवणारा संघ मालिकेतही २-१ अशी आघाडी घेईल.
महत्त्वाच्या बातम्या-
रहाणे पुन्हा अपयशी; पण कोहलीच्या अचूक निर्णयाला पाहून म्हणावचं लागेल, ‘हळूहळू जमतय..’!
उमेशच्या जादुई चेंडूने उखाडलं इंग्लंडचं ‘मूळ’, बघा डोळ्यांचे पारणे फेडणारी विकेट
‘त्याचे अर्धशतक माझ्या खेळीपेक्षाही खूप मोठे’, शार्दुलची दे दणादण फटकेबाजी पाहून सेहवागही प्रभावित