---Advertisement---

कडक षटकार अन् शतकाला गवसणी, रोहितच्या क्लास सेंचूरीनंतर पत्नीची ‘फ्लाइंग किस’; व्हिडिओ व्हायरल

On: रविवार, सप्टेंबर 5, 2021 10:03 AM
---Advertisement---

भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. रोहितने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (०४ सप्टेंबर) भारताच्या दुसऱ्या डावात शतकी खेळी केली आहे. त्याने मोईन अलीला षटकार मारून त्याचे शतक पूर्ण केले. हे शतक त्याचे विदेशातील पहिले कसोटी शतक ठरले आहे. रोहितने षटकार मारून शतक पूर्ण करताच कर्णधार विराट कोहली आणि अन्य भारतीय संघ आनंद व्याक्त करताना दिसला. यावेळी रोहितची पत्नी रितिका सजदेहही मैदानात जल्लोष साजरा करताना दिसली.

सोनी स्पोर्ट्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत रोहितने मोईन अलीला खणखणीत षटकार मारत आपले शतक पूर्ण केलेले दिसत आहे. षटकार मारल्यानंतर खेळपट्टीवर दुसऱ्या बाजूला असलेला चेतेश्वर पुजारा त्याची गळाभेट घेतो. त्याने केलेल्या शतकानंतर आनंदात कर्णधार कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सर्व भारतीय संघ पव्हेलियनमधून टाळ्या वाजवताना दिसतात. रोहितनेही त्याची बॅट हवेत भिरकावत चाहत्यांना अभिवादन केले.

यावेळी त्याने केलेल्या आप्रतिम खेळीला दाद देण्यासाठी त्याची पत्नी रितिकानेही स्टेडियममध्ये उभे राहून टाळ्या वाजवल्या आणि त्याला प्रोस्ताहन दिले. याबरोबरच ती आनंदाने रोहितला ‘फ्लाइंग किस’ देतानाही दिसली आहे.

https://twitter.com/Shubhamrai_/status/1434160806988443648?s=20

रोहितचे कसोटी कारकिर्दीतील हे आतापर्यंतचे आठवे शतक होते. तो लाॅर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकापासून काही धावा कमी असताना बाद झाला होता आणि त्यावेळी त्याचे शतक हुकले होते. चौथ्या कसोटी सामन्यात खेळताना त्याने ९४ धावा केल्या होत्या आणि मोईन अलीच्या चेंडूवर त्याने लाॅन्ग ऑनला षटकार मारला आणि त्याचे शतक पूर्ण केले. त्याने २०४ चेंडूंमध्ये हे शतक केले आहे. पुढे १२७ धावांचा आकडा गाठत ऑली रॉबिन्सनच्या चेंडूवर ख्रिस वोक्सच्या हातून तो झेलबाद झाला.

दरम्याने चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने त्यांच्या पहिल्या डावात १९१ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात २९० धावा करत भारतावर ९९ धावांची आघाडी घेतली होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ९२ षटकांमध्ये ३ विकेट्स गमावत २७० धावा केल्या आहेत. कर्णधार कोहली (२२ धावा) आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा (९ धावा) नाबाद खेळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

सुरुवातीलाच गेला असता, पण बर्न्समुळे रोहितला दोनदा जीवनदान; इंग्लिश दिग्गजाने घेतली फिरकी

षटकार अन् हिटमॅन, एक अनोखंच नातं! कारकिर्दीतील ‘हे’ ४ महत्त्वाचे टप्पे गाठताना रोहितने चेंडू केलाय सीमापार

यंदाचे वर्ष रो’हिट’! ‘असा’ कारनामा करणारा ठरलाय पहिलाच भारतीय, आता पंतलाही विक्रम करण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---