---Advertisement---

यंदाचे वर्ष रो’हिट’! ‘असा’ कारनामा करणारा ठरलाय पहिलाच भारतीय, आता पंतलाही विक्रम करण्याची संधी

On: रविवार, सप्टेंबर 5, 2021 1:54 AM
---Advertisement---

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर गुरुवारपासून (२ सप्टेंबर) ५ कसोटीच्या मालिकेतील चौथा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ९२ षटकांत ३ बाद २७० धावा केल्या आहेत. तसेच १७१ धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या या धावसंख्येत सलामीवीर रोहित शर्माने शतकी खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासह त्याने एक खास विक्रम केला आहे.

रोहित २०२१ वर्षात सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज
रोहितने भारताकडून दुसऱ्या डावात २५६ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १२७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २०२१ या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पार केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. त्याच्याव्यतिरिक्त यावर्षात एकाही भारतीय फलंदाजाला अद्याप १००० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

त्याच्या नावावर सध्या २०२१ वर्षात १७ सामन्यांतील २७ डावांत ४३.४८ च्या सरासरीने १०८७ धावांची नोंद झाली आहे. यामध्ये २ शतकांचा आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्यापाठोपाठ या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत (४ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारीनुसार) दुसऱ्या क्रमांकावर रिषभ पंत आहे. पंतने ९१३ धावा केल्या आहेत.

त्यामुळे पंतलाही या वर्षात १००० धावा करण्याची चांगली संधी आहे. कारण अद्याप त्याला ओव्हल कसोटीत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी यायचे आहे, त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धचा अखेरचा सामना बाकी आहे.

भारताकडून २०२१ वर्षात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (४ सप्टेंबर २०२१ पर्यंतची आकडेवारी)
१०८७ धावा – रोहित शर्मा (१७ सामने)
९१३ धावा – रिषभ पंत (१८ सामने)
७८५ धावा – विराट कोहली (१७ सामने)
५९१ धावा – चेतेश्वर पुजारा (११ सामने)
५०७ धावा – केएल राहुल (११ सामने)

रोहितची केएल राहुल, पुजारासह दमदार भागीदारी
रोहितने ओव्हल कसोटीत दुसऱ्या डावात १२७ धावांची खेळी करताना केएल राहुलसह पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची आणि पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागीदारी केली. राहुलने ४६ धावांची खेळी केली, तर पुजाराने ६१ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत १७१ धावांची आघाडी घेता आली आहे. तिसऱ्या दिवसाखेर विराट कोहली २२ धावांवर, तर रविंद्र जडेजा ९ धावांवर नाबाद खेळत आहे.

तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला होता, तर इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

कसोटीत षटकारासह सर्वाधिकवेळा शतक करणारा रोहित दुसराच भारतीय, पहिल्या क्रमांकावर ‘हा’ फलंदाज

रोहितनं शतकी खेळीसह इंग्लंडमधील गाजवली ७ मैदानं; ‘असा’ पराक्रम करणारा एकमेव विदेशी फलंदाज

नाद खुळा! विदेशातील पहिले कसोटी शतक झळकावताना रोहितने मारलेला षटकार, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---