इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू असून सामन्यातील दोन दिवसांचा खेळ संपलेला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. अशात भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने या मालिकेतील आपला पहिला सामना चांगलाच गाजवला आहे. चांगली कामगिरी करत भारताच्या कसोटी संघात त्याने दमदार पुनरागमन केले आहे.
मागच्या काही काळापासून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरसारख्या चांगल्या फार्ममध्ये असलेल्या गोलंदाजांमुळे उमेशला संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, आता त्याने २४७ दिवसांनंतर पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या प्रदर्शनाचा डंका पिटला आहे. त्यातही सामन्याच्या पहिल्या दिवशी संघासाठी महत्वाची जो रूटची विकेटही त्यानेच मिळवली आहे. यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर सामन्यांतील आपल्या कामगिरीविषयी मत व्यक्त केले आहे.
सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी उमेशने भारतीय संघासाठी महत्वाची कामगिरी केली. त्याने पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटची विकेट घेतला असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अजून २ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये क्रेग ओवरटन आणि डेविड मलान यांचा समावेश आहे.
यानंतर उमेश शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रूटच्या विकेटविषयी माध्यमांशी बोलत होता. तो म्हणाला, “हो, ही विकेट रूटचीच होती आणि माझ्या मित्रांनीही सांगितले की, तू संघात परतला आणि जो रूटचा विकेट मिळाली. मात्र, वैयक्तिक माझ्यासाठी एका वेगवान गोलंदाजाच्या रूपात रूटची विकेट मिळवणे किंवा जेम्स अँंडरसनची, दोन्ही एकसारखेच वाटते. एका वेगवान गोलंदाजाच्या रूपात माझे काम विकेट्स मिळवणं आहे आणि मी तसेच केले आहे. यानंतर मला फार चांगलं वाटतं आहे.”
उमेश यादवने या कसोटी सामन्यामध्ये भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री यांचा विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये उमेशने त्यांना मागे टाकले आहे. या सामन्यातील उमेशने मिळवलेली डेविड मलानची विकेट ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १५१ वी विकेट होती. त्याने या विकेटसह सर्वाधिक कसोटी विकेट्स मिळवण्याच्या विक्रमात रवी शास्त्रींची बरोबरी केली आहे. रवी शास्त्रींनी त्यांचे १५१ विकेट्स ८० कसोटी सामन्यांमध्ये मिळवले होते. सध्या रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यवर गेले आहेत. आगामी टी२० विश्वचषकानंतर त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पोप-अलीची भागिदारी तोडण्यासाठी कोहलीचा जडेजासंगे ‘मास्टरप्लान’ अन् पुढच्याच चेंडूवर खेळ खल्लास
‘त्याच्यावर गरजेपेक्षा जास्तच विश्वास दाखवतोय कर्णधार’, माजी क्रिकेटरने केली जडेजाची थट्टा
‘सीएसके, सीएसके…’, मोईनला पाहून भारतीय चाहत्यांची नारेबाजी; अष्टपैलूही झाला ‘असा’ रिऍक्ट