भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी १४ वर्षानंतर आशा निर्माण झाली आहे. मात्र, इंग्लंडचा एक खेळाडू भारतीयांच्या या स्वप्नाचा सर्वात मोठा अडथळा आहे. हा खेळाडू भारताविरुद्ध असा खेळतो, जसे त्याचे भारतासोबत मागच्या जन्माचे वैर आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बोटावर मोजण्याइतकेच खेळाडू आहेत, ज्यांनी भारताविरुद्ध २१०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या खेळाडूंमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटचाही नाव आहे. दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात जेव्हा, तो मैदानात येईल तेव्हा त्याच्या नावावर एक नवीन विक्रम करू शकतो.
कर्णधार जो रूटने यावर्षी भारताविरुद्ध तीन शतके केली आहेत. यातील पहिले शतक त्याने चेन्नईमध्ये केले आहे. त्याने त्याच्या चैन्नईमधल्या शतकाला दुहेरी शतकात परावर्तीत केले होते. लाॅर्ड्सवरील सामन्यातही तो शतकी खेळी केल्यानंतर नाबाद राहिला होता. नाॅटिंघममध्येही त्यानं भारताला शतकी तडाखा दिला होता. त्याने आतापर्यंत भारताविरुद्ध २२ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने या सामन्यांमध्ये ६०.४१ च्या सरासरीने २१७५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ७ शतकांचाही समावेश आहे.
जगातले काहीच खेळाडू आहेत, ज्यांनी भारताविरुद्ध कसोटीमध्ये २१०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाॅंटिंगने केल्या आहेत. त्याने ५४.३६ च्या सरासरीने २५५५ धावा केल्या आहेत, यात ८ शतकांचा समावेश आहे.
ऍलिस्टर कुकने भारताविरुद्ध ३० सामन्यांमध्ये ४७.३६ च्या सरासरीने आणि ७ शतकांसह २४३१ धावा केल्या आहेत. क्लाइव लाॅयडने ५८.६० च्या सरासरीने आणि ७ शतकांसह २३४४ धावा केल्या आहेत. मात्र, या तिन्ही फलंदाजांची सरासरी जो रूटच्या सरासरीपेक्षा कमी आहे.
जावेद मियाँदादचा विक्रम तोडू शकतो रूट
पाकिस्तानचा जावेद मियाँदाद असा खेळाडू आहे, ज्याने भारताविरुद्ध जो रूटपेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत आणि त्याची सरासरीही रूटपेक्षा जास्त आहे. मात्र, लीड्सच्या सामन्यात त्याचा हा विक्रम मोडित निघू शकतो. मियाँदादने भारताविरुद्ध ६७.५१ च्या सरासरीने ५ शतकांसह २२२८ धावा केल्या आहेत. म्हणजेच, जो रूट त्याच्यापेक्षा केवळ ५३ धावांनी मागे आहे. जो रूटचा सध्याचा फार्म पाहून असेच वाटते की, तिसऱ्या कसोटी सामन्यात रूट त्याचा हा विक्रम मोडेल. शतकांच्या बाबतीत रूटने मियाँदादला आधीच मागे सोडले आहे.
तसेच शिवनारायण चंद्रपॉल याचीही सरासरी सध्या रुटपेक्षा अधिक आहे. मात्र, त्याच्या धावा रुटपेक्षा कमी आहेत. चंद्रपॉलने भारताविरुद्ध २५ सामन्यांत ६३.८५ च्या सरासरीने ७ शतकांसह २१७१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘भाऊ, माझा भाला परत दे’, जेव्हा नीरजला फायनलआधी पाकिस्तानी खेळाडूकडून मागावा लागला स्वत:चा भाला
अख्ख्या टीम इंडियाला पुरून उरले इंग्लंडचे दोन पठ्ठे! इतिहासात चौथ्यांदा रचली गेली ‘अशी’ भागीदारी