न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मंगळवारी (१४ जून) निकाली लागला. इंग्लंडने शेवटच्या दिवशी ५ विकेट्स राखून सामना नावावर केला. इंग्लंडला विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या डावात त्यांचा अनुभवी फलंदाज जॉनी बेयरस्टो याने झंझावाती शतक ठोकले, तर नुकतेच इंग्लंडचे कसोटी कर्णधारपद मिळालेल्या बेन स्टोक्स याने ७५ धावांची विजयी खेळी केली. परंतु या विजयानंतरही इंग्लंड संघाला धक्का बसला आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी) ने दंड आकरला आहे.
न्यूझीलंडचा दुसरा डाव शेवटच्या दिवशी संपुष्टात आला आणि अडचणीत सापडलेल्या इंग्लंडसाठी बेयरस्टोच्या वेगवान शतकाच्या जोरावर इंग्लंडने शेवटच्या दिवशी ५ गडी राखून सामना जिंकला. अवघ्या ७७ चेंडूत बेयरस्टोने त्याचे शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील शेवटच्या डावातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. तर इंग्लंडचे कर्णधारपद भूषवणाऱ्या बेन स्टोक्स नाबाद ७५ धावांची विजयी खेळी करत सामना आपल्या खिशात घातला. या विजयाबरोबर इंग्लंडने न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
याच सलग दोन विजयांबरोबर इंग्लंडचा संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र दुसऱ्या कसोटीमध्ये षटकांची गती कमी राखल्यामुळे त्यांचे २ गुण आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीतून कमी करण्यात आले आहेत, तर सर्व खेळाडूंच्या सामन्याच्या वेतनातून ४०% वेतनात कपात केली आहे.
आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये षटकांची गती कमी राखल्यामुळे इंग्लंडचे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीतून १२ गुण कमी करण्यात आले आहेत. त्याचमुळे सामने जिंकूनही इंग्लंडच्या गुणांमध्ये जास्त फरक दिसून येत नाहीये. मात्र येत्या काही सामन्यात विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत फेरबदल करण्याचा विचार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रॅंडन मकूल्लम यांनी केला असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अभिमानस्पद! भारताचा सुनील छेत्री बड्याबड्या फुटबॉलपटूंना पडतोय भारी, पाहा काय केला विक्रम
ऋतुराजच्या झेलची कायच बात! हवेत उडी मारत एका हाताने पकडला ‘किलर मिलर’चा कॅच
वयाच्या २३व्या वर्षी अर्धशतकवीर इशान किशनच्या नावे मोठी कामगिरी; रैना, रोहित आणि विराटशी बरोबरी