गुरुवारी (दि. २ जून) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेची सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्यात दिवशी एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडचे फलंदाज पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसले. न्यूझीलंडला पहिला झटका लागला सलामीवीर विल यंगच्या रूपात. यंगला बाद करण्यासाठी जॉनी बेयरस्टोने जो झेल घेतला, तो पाहिल्यानंतर कोणीही त्याचे कौतुकच करेल.
पहिल्या डावातील तिसऱ्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग (Will Young) जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याच्या हातात झेलबाद झाला. त्यावेळी दिग्गज जेम्स अँडरसन (James Anderson) गोलंदाजी करत होता. पाच महिन्यांनंतर इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या अँडरसनच्या षटकातील पहिलाच चेंडू यंगच्या बॅटचा किनारा घेऊन स्लिप्समध्ये उभा असलेल्या बेयरस्टोच्या हातात गेला आणि यंगने (१) स्वस्तात विकेट गमावली.
चेंडू यंगच्या बॅटला लागला आणि तिसऱ्या आणि चौथ्या स्लिप्सच्या मध्ये गेला. त्याठिकाणी बेयरस्टोला क्षेत्ररक्षणासाठी तैनात केले गेले होते आणि त्याने स्वतःची जबाबदारी चोख पार पाडली. चेंडू दोघांच्या मध्ये होता, पण बेयरस्टो थोडा पुढे असल्यामुळे त्याच्या हालात लवकर पोहोचला. बेयरस्टोने हा झेल पकडण्यासाठी त्याच्या डाव्या बाजूला डाईव्ह मारली आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. हा झेल पकडल्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये बेयरस्टोसाठी टाळ्या वाजताना दिसल्या. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oh Jonny Bairstow! 😱
Match Centre: https://t.co/kwXrUr13uJ
🏴 #ENGvNZ 🇳🇿 |@jbairstow21 pic.twitter.com/Rq89Opc31D
— England Cricket (@englandcricket) June 2, 2022
दरम्यान, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोन्ही दिग्गज मोठ्या काळानंतर इंग्लंडच्या कसोटी संघात परतले आहेत. अँडरसनने त्याच्या पहिल्यात तीन षटकांमध्ये न्यूझीलंडच्या सलामीवीर जोडीला तंबूत धाडले. अँडरसनने दिलेल्या चांगल्या सुरुवातीमुळे मॅटी पॉट्सने घेतली. या दोघांनीही पहिल्या डावात प्रत्येकी चार-चार विकेट्स नावावर केल्या. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या १३२ धावांवर गुंडाळला गेला. न्यूझीलंडच्या पहिल्या ६ खेळाडूंपैकी एकालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बाप-लेकीची जोडी जगात भारी’, अजिंक्य रहाणेने शेअर केला मुलीसोबतचा सुपर क्यूट व्हिडिओ
अश्विनने दाखवली हिंमत; आपल्या खराब प्रदर्शनाबाबत केले लक्षवेधी विधान, “मी माझ्या वाईट प्रदर्शनाचा..”
तळागाळापर्यंत टेनिसच्या प्रसारासाठी एमएसएलटीएसोबत पीसीएमसीचा पुढाकार