आगामी टी20 विश्वचषकाची सुरुवात 2 जूनपासून होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं एक रेकाॅर्ड धोक्यात आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. परंतु पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आज (30 मे) रोजी इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकवण्यात यशस्वी झाला. तर तो कोहलीचा विक्रम मोडीत कोढू शकतो.
आज (30 मे) रोजी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान 4 टी20 सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. या मालिकेतील 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. पाकिस्तान या टी20 मालिकेत 0-1 ने मागे आहे. आगामी टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान आणि इंग्लंड दोन्ही संघांचा शेवटचा टी20 सामना आहे. त्यानंतर दोन्ही संघ टी20 विश्वचषकासाठी सज्ज राहतील.
विराट कोहलीनं 117 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये कोहलीनं 4037 धावा बनवल्या आहेत. तो जगातला एकमेव खेळाडू आहे, ज्यानं आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 4000 धावांपेक्ष्या जास्त धावा ठोकल्या आहेत. परंतु बाबर आझमनं जर इंग्लडविरुद्ध अर्धशतक ठोकलं तर, तो कोहलीच्या विक्रमाची बरोबरी करणार आहे. कोहली आणि बाबर दोन्ही खेळाडूंची आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील 122 ही सर्वाधिक धावसंख्या आहे.
बाबर आझम 118 टी20 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्यानं 3987 धावा बनवल्या आहेत. कोहलीच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी त्याला फक्त 50 धावांची आवश्यकता आहे. परंतु कोहलीचं रेकाॅर्ड मोडीत काढण्यासाठी त्याला 51 धावा लागणार आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मादेखील मागे नाही. रोहितनं 151 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3974 धावा बनवल्या आहेत. विराट कोहली आणि बाबर आझमनंतर रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे.
आतापर्यंत विराटनं त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 117 सामन्यात 37 अर्धशतकांसह 1 शतक झळकावलं आहे. तर पाकिस्तान कर्णधार बाबर आझमनं त्याच्या 118 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 अर्धशतकांसह 3 शतक ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टी 20 विश्वचषकापूर्वी सूर्या चमकला! आयसीसीच्या “टी 20 क्रिकेटर ऑफ द ईयर” पुरस्काराने सन्मानित
टी20 विश्वचषकापूर्वी ब्रायन लारानं केली भविष्यवाणी ‘हे’ 4 संघ ठरणार सेमीफायनलसाठी पात्र
मोठी बातमी! प्रज्ञानानंदाने रचला इतिहास मॅग्नस कार्लसनचा केला नाॅर्वे बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेमध्ये प्रथमच पराभव