---Advertisement---

विंडीजच्या कर्णधाराने तब्बल ७१० मिनिटे केली फलंदाजी; एकट्याने ८१.३ षटके खेळत रचला ‘हा’ मोठा विक्रम

On: रविवार, मार्च 20, 2022 6:23 PM
Kraigg-Brathwaite
---Advertisement---

सध्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यामध्ये बार्बाडोस येथे दुसरी कसोटी खेळली जात आहे. ही कसोटी सुद्धा अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. या कसोटीत इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ५०७ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिज संघासमोर ठेवले. यानंतर वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटच्या नेतृत्वाखाली संघाने ४११ धावा केल्या. त्याने १७ चौकारांच्या मदतीने १६० धावा केल्या. कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळ समाप्त होईपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता ४० धावा केल्या. इंग्लंड संघाने १३६ धावांची आघाडी घेतली. 

ब्रेथवेटची (Kraigg Brathwaite) ही खेळी संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज ब्रायन लाराच्या ४०० धावांच्या विश्वचषक विक्रमानंतर एका वेस्टइंडिजच्या खेळाडूने खेळलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. ब्रेथवेट पाहुण्या संघाविरुद्ध ७१० मिनिटे क्रीजवर होता. ब्रायन लाराच्या नावे २००४ साली इंग्लंडविरुद्ध ७७८ मिनिटे फलंदाजी करण्याचा विक्रम आहे. या दरम्यान त्याने ४०० धावांची नाबाद खेळी करण्याचा विश्वविक्रम केला होता. वेस्ट इंडिजने चौथ्या दिवसाची सुरुवात २८८ धावांपासून केली. यावेळी कर्णधार १०९ धावांवर होता. त्याला जॅक लीचने बाद केले.

ब्रायन लाराने ४०० धावा करताना ५८२ चेंडूंचा सामना केला. त्याच्यानंतर आता ब्रेथवेट वेस्ट इंडिजकडून एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा खेळाडू बनला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध बार्बाडोसमध्ये ४८९ चेंडूंचा सामना केला आहे. ब्रेथवेट बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव काही काळातच संपुष्टात आला. संघाने ४११ धावा केल्या. काही कारणांमुळे कसोटीच्या चौथ्या दिवशी २ षटके अगोदरच डाव समाप्त केला गेला. सध्या इंग्लंड संघ १३६ धावांनी पुढे आहे. आता पाचव्या दिवशी कसोटी अनिर्णित राहण्याची शक्यता आहे.

नुकताच इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तेथे संघाने ५ कसोटी सामन्यांची मालिका ४-० ने गमावली, त्यानंतर इंग्लंडमध्ये अनेक बदल केले गेले, तर यापूर्वी वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध कसोटी मालिका पराभूत झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कशी नशिबानं थट्टा मांडली! धोनीचा हुकमी एक्का, २०१४चा पर्पल कॅप विजेता; यंदा बनलाय गुजरातचा ‘नेट बॉलर’

आयपीएलमध्ये रैनाला मिळाली नाही संधी, पण मालदीव सरकारने दिलाय मोठा पुरस्कार

Womens World Cup 2022: न्यूझीलंड संघाची कर्णधार चालू सामन्यातून बाहेर; कारण घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---